आमडी(हिवरी) येथे नि:शुल्क नेञ तपासणी व चष्मा वितरण शिबिर संपन्न…

 

       कमलसिंह यादव

तालुका प्रतिनिधी पारशिवनी 

 

पारशिवनी :- पारशिवनी तालुक्यातील आमडी(हिवरी), येथे “आपला आमदार आपल्या सेवी अभियानातंर्गत आमदार वैद्यकीय व दिव्यांग सहाय्यता कक्ष तर्फे निःशुल्क नेत्र तपासणी,मोतिबिंदु तपासणी व मोफत चष्मे वाटप शिबीर घेण्यात आले होते.

      आमडी येथील ग्राम पंचायत कार्यालयच्या सभागृहात शिबिर घेण्यात ण्यात आले होते.या शिबिराचे उदघाटन आमडी गट ग्राम पंचायतच्या सरपंच्या सौ.शुभांगी राजु भोस्कर(सरपंच) यांच्या हस्ते करण्यात आले.

     या प्रसगी महात्मे आय बॅंक हाॅस्पीटल,नागपूर येथिल तज्ञ डाॅक्टरांद्वारे नागरीकांची नि:शुल्क नेञ तपासणी करण्यात आली.

       यात या शिबिरात एकूण २२० लाभार्थीनी लाभ घेतला. यामध्ये मोतिबिंदु ऑपरेशन करिता लाभार्थीं-४८, व औषधी द्वारे उपचार होणारे लाभार्थीं -३२,व चष्मे करिता-१४० लाभार्थींनी लाभ घेतला. 

        येत्या दि.१८जुलै रोजी मोफ़त चष्मे वाटप करण्यात येणार आहे.

       या कार्यक्रम प्रसंगी राजुजी भोस्कर शिवसेना तालुका प्रमुख पारशिवनी,नरेंद्र चव्हाण- ग्रा. पं.सदस्य,शिलाताई सोनवाने-ग्रा. पं.सदस्य, सुनीता ताई लोहरे-ग्रा.पं. सदस्य,दिलीप केळवदे, वाल्मीक गडे, रामलखन गुप्ता, कृष्णा देऊळकर ,सौ.बेबिबाई झाडे, सामाजिक कार्यकर्ता गौरव पनवेलकर, सुमित कामड़े,उपस्थित होते.

      आमदार आशिष जयस्वाल यांनी “आपला आमदार आपल्या सेवी” अभियानातंर्गत आमदार वैद्यकीय व दिव्यांग सहाय्यता कक्ष सुरु केलेला आहे.

       यामध्ये रामटेक विधानसभा मतदार संघातील लोकांसाठी ३६५ दिवस २४ तास वैद्यकीय मदत क्रमांक 7887883377 सुरु केलेला आहे.याद्वारे मुख्यमंञी सहाय्यता निधी,रुग्ण वाहिकासह विविध सुविधा पुरविल्या जाणार आहे.