राजेंद्र रामटेके
विशेष प्रतिनिधी
पेसा भरती प्रक्रियाच्या संदर्भात मुंबई येथे बैठक संपन्न झाली.या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मंत्री श्री.नरहरी झिरवाळ आणि मंत्री श्री.अशोक उईके होते.
या बैठकीस ६७-आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार श्री. रामदासजी मसराम यांनी देखील उपस्थिती लावली होती.
बैठकीत पेसा कायद्याच्या अंमलबजावणी,आदिवासी हक्कांचे संरक्षण व ग्रामसभांच्या सक्षमीकरणासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांवर सविस्तर चर्चा बैठकीत झाली.
आमदार रामदास मसराम यांनी आपल्या मतदारसंघातील स्थानिक समस्यांकडे मंत्र्यांचे लक्ष वेधले व या संदर्भात ठोस पावले उचलण्याची मागणी केली.
बैठकीत निर्णय घेण्यात आला की,पेसा कायद्याची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना कार्यवाहीसाठी निर्देश देण्यात येतील.
तसेच,आदिवासी भागात ग्रामसभांना अधिक स्वायत्तता देण्यासाठी नवीन उपाययोजना हाती घेण्यात येणार आहेत.ही बैठक पेसा कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.
या बैठकीला गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष खासदार डॉ.नामदेवराव किरसान हे सुध्दा उपस्थित होते.



