मुनघाटे महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन साजरा…

 भाविक करमनकर 

धानोरा तालुका प्रतिनिधि 

    धानोरा- येथील श्री जीवनराव सिताराम पाटील मुनघाटे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय धानोरा येथे महाविद्यालयातील मराठी विभागातर्फे मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला.

            याप्रसंगी महाविद्यालयातील इतिहास विभाग प्रमुख प्रा डॉ किरमीरे सर यांनी अध्यक्षस्थान भूषविले तर प्रमुख पाहुणे म्हणून गृह- अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा डॉ विणा जम्बेवार,प्रा डॉ पंढरी वाघ प्रा ज्ञानेश बनसोड प्रा डॉ डी बी झाडे यांच्यासह ईतर मान्यवर मंडळी आवर्जुन उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख प्रा डॉ गणेश चुदरी सर यांनी केले.

            कार्यक्रमाची सुरुवात वि वा शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.

                यावेळी अध्यक्षीय भाषणातून प्रा डॉ किरमीरे सर यांनी मराठी भाषेचे महत्व सांगून तिचे संवर्धन व जतन करणे ही काळाची गरज आहे असे मत व्यक्त केले तर मराठी विभाग प्रमुख प्रा डॉ गणेश चुदरी सर यांनी मराठी भाषेचा इतिहास भवितव्य आणि मराठी भाषेपुढील आव्हाने स्पष्ट करून मराठीचे अस्तित्व टिकविणे सर्वांची जबाबदारी आहे असे मत आपल्या प्रास्ताविकेमधून पटवून दिले.

           कार्यक्रमाचे संचालन प्रा प्रशांत वाळके तर आभार प्रा डॉ संजय मुरकुटे सर यांनी केले यावेळी महाविद्यालयातील प्रा डॉ धवनकर प्रा डॉ गोहणे प्रा नितेश सर प्रा डॉ पठाडे प्रा भैसारे मॅडम ई प्राध्यापक तथा प्रशासकीय कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते कार्यक्रम यशस्विततेसाठी राकेश वाढणकर यांनी मोलाचे सहकार्य केले.