Home Social पथनाट्यातून मुलींची सायबर सुरक्षा विषयी जनजागृती…

पथनाट्यातून मुलींची सायबर सुरक्षा विषयी जनजागृती…

ऋषी सहारे 

  संपादक

           प्रजासत्ताक दिनानिमित्य आवान हायस्कूल आंधळी (फाटा )ता. कुरखेडा जि. गडचिरोली येथे वार्षिक स्नेह संम्मेलनाचे आयोजन करण्यात आले.यात पथनाट्यातून मुलींनी सायबर सुरक्षा विषयी जनजागृती केली.सदर कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

          विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात देशभक्ती,आदिवासी संस्कृती ,लोकनृत्य,व्यसनमुक्ती अश्या विविध विषयावर मनोरंजनासोबतच जनजागृती करणारे बहारदार कार्यक्रम सादर केले .सद्या प्रचलित असलेला विषय म्हणजे ‘मुलींची सायबर सुरक्षा ‘ या संदर्भांत शाळेतील संगणक निदेशिका पोर्णिमा आनंदराव शेंडे यांच्या मार्गदर्शनात ‘सायबर सुरक्षा ‘”Instagram fake profile सावध रहा ! सावध रहा !” अश्या शीर्षका खाली वर्ग ९विच्या विद्यार्थिनीं कु. तेजस्विनी नागोसे ,कु .विद्या मानकर ,कु .हिना राऊत ,कु .प्रीती आत्राम व वर्ग ८विचा विदयार्थी चैत्यन्य नैताम या विद्यार्थ्याने प्रेक्षकांसमोर मनोरंजनासोबतच सायबर सेक्युरिटी संदर्भांत उत्कृस्ट अभिनय सादरीकरण करून प्रेक्षकांची मने जिंकली.

             शाळेतील मुख्याद्यापक सोनवाने सर यांनी विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले. विद्यार्थ्यांचे कौतुक बघण्यासाठी गावातील नागरिक सुद्धा कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते.कार्यक्रमाचा यशस्वीतेसाठी साळेतील शिक्षक वृंद व शिक्षकेत्तर शिक्षकांनी भरपूर परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.