मौजा देलनवाडी येथे मां विरांगणा मुक्ताई जयंती व नागदिवाळी महोत्सव साजरा..

अनिलकुमार एन. ठवरे

जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली

       दखल न्युज भारत

देलनवाडी :- माना आदिम जमात मंडळ व विद्यार्थी युवक संघटना देलनवाडीच्या वतीने दिनांक २५ डिसेंबर २०२३ ते २६ डिसेंबर २०२३ असा दोन दिवसीय भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.या प्रसंगी मुठपुजा व खडपुजा,दिव्यांची मिरवणूक,भजनाचा कार्यक्रम व रात्रौ महिलांचे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

          समारोपीय कार्यक्रमाला महिलांचे हळदी – कुंकू व स्नेहभोजन ठेवण्यात आले.समाजामध्ये धार्मिकता व अध्यामिक्ता निर्माण होण्यासोबतच अंधश्रध्दा दूर होऊन जनजागृती करण्यासाठी रात्रोला सप्त खंजिरी वादक प्रबोधन कार सत्यपाल महाराज यांचे शिष्य प्रदिप पाल महाराज यांचे फुले,शाहू,आंबेडकर तथा इतर प्रबोधन पर जाहीर किर्तनाचे आयोजन करण्यात आले.

           वरील कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून श्री. फाल्गुनजी घोडमारे ए.पी.आय.चंद्रपूर,श्री.आबाजी कंनाके,श्री. दिगेश्वरजी धाईत काँग्रेस तालुका कमेटी कोष्याध्यक्ष,श्री.अनिलकुमार ठवरे जिल्हा प्रतिनिधी दखल न्युज भारत,श्री. मानिकजी पेंदाम,श्री. दिलीपजी भरणे,श्री.संजयजी किरमिरे,श्री.रमेशजी भैसारे,श्री. मिनेश्वर्जी जांभुळे व इतर मान्यवर उपस्थित होते.

          कार्यक्रमाचे संचालन श्री.प्रशांत ढोक व आभार प्रदर्शन श्री. घनश्याम घोडमारे यांनी केले.या संपूर्ण कार्यक्रमास गावातील नागरिक,युवक- युवती व विद्यार्थी यांचे सहकार्य लाभले.