“अवलमारी” येथील चमत्कारिक पर्यटन स्थळ लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षतेपणामुळे उपेक्षित…

प्रितम जनबंधु

     संपादक 

           अहेरी तालुक्यातील व्यंकटापुर जवळ “अवलमारी” हे गाव असून, गावापासून साधारणतः ५०० मीटर वर एक अद्भुत अश्या प्रकारचा चमत्कारिक पाण्याचा कुंड आहे. कुंडाजवळ हाताने टाळी वाजवली किंवा जोराने आवाज जरी केला तरी त्या कुंडामधून स्वच्छ पाण्याचा प्रवाह होत असुन बुळबुळ असा उखडत्या पाण्यासारखा पाण्याचा प्रवाह वाढतो. निसर्गाचा अदभुत चमत्काराचा नमुना म्हणून या कुंडाकडे पाहिल्या जाते. 

      नैसर्गिक चमत्कार,बघा व्हिडिओ 

            या कुंडातून बारमाही उन्हाळ्यात सुध्दा तेवढाच पाणी वाहत असतो. दिनांक २५ डिसेंबर रोजी महाराष्ट्र राज्याचे आदिवासी काँग्रेसचे अध्यक्ष तथा माजी आमदार डॉ नामदेवराव उसेंडी यांनी त्या भागाचा दौरा करून या स्थळाला भेट दिली असता, त्या कुंडापर्यंत जाण्यास मार्ग नाही. तसेच या पर्यटन स्थळाचा विकास करण्यासाठी कुठल्याच लोकप्रतिनिधीनी लक्ष केंद्रित केली नसुन या चमत्कारिक भागाचा विकास करण्यास सामोरा घेताना दिसून येत नाही. असी वैचारिक खंत माजी आमदार डॉ. उसेंडी यानी व्यक्त केली आहे.

              या पर्यटन स्थळाला चालना दिल्यास वेगवेगळ्या भागातील पर्यटक या स्थळाकडे आकर्षित होतील. त्या परिसरातील लोकांना रोजगार मिळून त्यांचा आर्थिक परिस्थिती मध्ये सुधारणा होऊ शकते. असा आशावाद व्यक्त केला असुन यासाठी जिल्हा प्रशासनाकडे या पर्यटन स्थळाचा विकास करावा अशी मागणी डॉ उसेंडी यांनी केले आहे.