Home Political विधानसभा निवडणूक पूर्व रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूका घ्या :- माजी जि.प.उपाध्यक्ष...

विधानसभा निवडणूक पूर्व रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूका घ्या :- माजी जि.प.उपाध्यक्ष जिवन पाटील नाट यांची मागणी…

    राकेश चव्हाण

कूरखेडा तालुका प्रतिनिधी 

       जिल्हातील जिल्हा परिषद पंचायत समिति तसेच नगरपरिषदेचा कालावधी पूर्ण होऊनही या स्थानिक स्वराज्य संस्थाचा निवडणूका मागील एक वर्षापेक्षा अधिक कालावधीपासून रखडलेल्या आहेत.

           त्यामूळे सर्वसामान्याचा समस्या मार्गी लावण्याकरीता अडचणी येत आहे या निवडणूकाचा कार्यक्रम तातडीने घोषित करीत विधानसभा निवडणूक पूर्व या घेण्यात याव्या अशी मागणी माजी जि.प.उपाध्यक्ष तथा कांग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष जिवन पाटील नाट यानी केली आहे.

             सद्या केंद्र व राज्यात भाजप प्रणीत सरकार आहे मात्र या शाशनाचा स्थानिक स्वराज्य संस्था संदर्भात विशेष आस्था नाही काही तांत्रिक अडचणीचा बाऊ करीत स्थानिक स्वराज्य संस्थाचा निवडणूका लांबविण्यात येत असल्याने स्थानिक स्तरावर नागरीकांचा समस्या मार्गी लावण्याकरीता लोकप्रतिनिधि अभावी अडचणी निर्माण होत आहे.

          या संस्थावर सद्या शासकीय अधिकाऱ्याची  अघोषित हूकूमशाही सूरू आहे.सर्व सामान्याचा आवाज बूलंद करण्याकरीता येथे लोकप्रतिनिधिची गरज आहे. या संस्थावर लोकप्रतिनिधिचा हक्क डावलत शासकीय अधिकाऱ्याच्या मार्फत सर्व सत्तेची सूत्र आपल्या हाती ठेवण्याची राज्य शासनाची कूटील मानसीकता दिसून येत आहे.

           सत्तेचे केन्द्रीयकरण ही लोकशाहीचे अवमूल्यन आहे. स्थानिक स्तरावर शासकीय यंत्रणेवर नियंत्रण करीता लोकप्रतिनिधि असने गरजेचे आहे.त्यामूळे या रखडलेल्या निवडणूका तात्काळ घेण्यात याव्या अशी मागणी जिवन पाटील नाट यानी केली आहे.