भाविकदास करमनकर
धानोरा तालुका प्रतिनिधी
आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी दिनांक २७ जून रोजी धानोरा येथील ग्रामीण रुग्णालयाला अचानक भेट देऊन रुग्णालयातील सेवा, स्वच्छता, औषधे व यंत्रसामग्री यांचा आढावा घेतला.
यावेळी रुग्णांशी संवाद साधून रुग्णाची विचारपूस केली त्यानंतर डॉक्टर व कर्मचाऱ्यांशी चर्चा करून रुग्णालयातील सुविधा व अडचणींची पाहणी करून तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.
यावेळी डॉक्टर व कर्मचाऱ्याशी संवाद साधताना “ग्रामीण जनतेला दर्जेदार आरोग्य सेवा मिळणं हीच माझी प्राथमिकता आहे” असे मत डॉ. मिलिंद नरोटे यांनी व्यक्त केले.
यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष साजन गुंडावार नगरसेवक संजीव कुंडू अनिल मशाखेत्री बाळू उंदीरवाडे सुभाष धाईत राकेश दास गजानन परचाके ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.रमेश गजबे व त्यांचे सहकारी आदी उपस्थित होते.



