1.शेतकरी आत्महत्या करीत आहेत.
2.उत्पादन खर्चानुसार शेतीमालाला भाव का मिळत नाही?
3.उत्पादन खर्चानुसार कारखान्यातील वस्तूंना भाव का मिळतो?
4.शिकलेल्या तरुणांना नोकरी का मिळत नाही ?
5.अशिक्षित लोक शेतमजुरी का करीत नाहीत ?
6.वरचेवर महागाई का वाढते आहे?
7.वरचेवर बेकारी का वाढते आहे?
8.गाव सोडून लोकं शहराकडे का जाताहेत?
9.आयुष्यभर काम करूनही कारखान्यातील कामगार हा कामगारच असतो , असे का?
10.शेतकामासाठी मजूर का मिळत नाहीत?
11.रुपयाची किंमत वरचेवर का कमी होत आहे?अवमूल्यन.
12.महागाई कमी का होत नाही?
13. तरुण लोक व्यवसाय ऐवजी खाजगी किंवा सरकारी नोकरीस प्राधान्य का देतात?
14. सहकारी क्षेत्रातील उद्योग व्यवसाय बंद का पडतात?
15. खाजगी क्षेत्रातील उद्योग आणि व्यापार नफ्यात का चालतो?
16. राजकीय लोक आणि कर्मचारी भ्रष्टाचार का करतात?
17. गरीबांना श्रीमंत का व्हावेसे वाटते? मध्यमवर्गीयांना पण श्रीमंत का व्हावेसे वाटते?
18. लोकं इमानदारीने उद्योग व्यापार का करीत नाहीत?
19. साठेबाजी का करतात?
20. काळाबाजार का करतात?
21. अन्याय अत्याचार बलात्कार का होतात?
22. गुंडगिरी दादागिरी का वाढते आहे?
23. चोऱ्या का होतात?
24. मारामाऱ्या खून का होताहेत?
25. मुले सुना आई वडिलांची जबाबदारी का स्वीकारीत नाहीत? त्यांची सेवा काळजी का करीत नाहीत? त्यांना का वेगळे ठेवतात? वृद्धाश्रमाची संख्या का वाढत आहे?
26. सख्खे भाऊ पक्के वैरी का बनताहेत?
27. नातेसंबंध का दुरावत आहेत?
28. घटस्फोटाचे प्रमाण का वाढत आहे?
29. लेकुरवाळ्या बाया नवऱ्याच्या ऐवजी दुसऱ्याच्या प्रेमात का गुंतत आहेत? त्या प्रियकरासोबत का पळून जात आहेत?
30. सुशिक्षित तरुण पोलिस आणि सैन्यात भरती का होताहेत? जीव धोक्यात का घालताहेत?
31.शेजारी किंवा इतर देशातील नागरिक सीमा ओलांडून नातेसंबंध का जोडतात? नाते संबंधासाठी सीमा बंधन असावे असे का वाटत नाही? प्रत्येक देशातील नागरिकांना सीमबंधन नको आहे,तर मग अलग अलग देश कशासाठी? ती गरज कुणाची? अन का?
15. जाती आणि धर्माचे हल्ली तेढ फारच वाढले आहे,का?
16. राजकीय पुढारी निवडणुकीत जे आश्वासने देतात त्याचे पालन करीत नाहीत,तरी मतदार त्यासच निवडून देतो असे का?
17. भ्रष्टाचाराचा पैसा संपती ई डी या सरकारी संस्थेने जप्त करायला हवी,ती का करीत नाही? ती विरोधी पक्षांना जेल मध्ये टाकते आणि सत्ताधाऱ्यांना भ्रष्टाचार करायला रान मोकळे ठेवते असे का?
18. युद्धात अणुबाँब चा वापर केला तर त्याचे दुष्परिणाम म्हणजे पर्यावरण बिघडणे आणि जगातील साऱ्याच माणसांची अवयव वेडी वाकडी होणे ,असे परिणाम होतात,म्हणून अनु युद्धे करू नये,असे जागतिक संघटनेचे म्हणणे आहे,तर मग या संघटनेने काही देशांना अणुबाँब करण्यास का रोखले नाही.आजमितीस सात देशाकडे अणुबाँब आहेत,जास्तीत जास्त अमेरिकेकडे म्हणजे 5 हजारच्या वर आणि कमीत कमी पाकिस्तानकडे म्हणजे 250 अणुबाँब आहेत.अमेरिके नंतर रशिया,चीन,फ्रान्स,जर्मनी,भारत,पाकिस्तान असा क्रम आहे.आशिया खंडात आपले वर्चस्व ठेवण्यासाठी अमेरिका पाकिस्तानास अणुबाँब बनवायला मदत केला,आणि रशिया भारताला मदत केला.असे का घडले?
19. तिसरे महायुद्ध होण्याची शक्यता आहे का ? झाले तर कोणत्या इसवीसनात होईल ? आणि त्याचे जगावर काय परिणाम होतील ?
20. एकाच धर्मियांची लोकशाही कोणत्याही देशात असणे हे फायद्याचे की धोक्याचे ?
वरील 20 प्रश्न का निर्माण झाले ? कसे निर्माण झाले ,? त्याचे कारण ? या प्रश्नासाठी जबाबदार कुणाला धरावे ? यावर उपाय काय ?
आपण माझ्या 9420912209 या वॉट्सप नंबरवर आपले विचार थोडक्यात पाठवावेत,विनंती.



