काकडयेली येथे बस फेल,प्रवाशांना मनस्ताप….

 भाविक करमनकर 

धानोरा तालुका प्रतिनिधि 

        गडचिरोली येथून धानोरा साठी निघालेली बस काकडयेली येथे ५:३० वाजता च्या दरम्यान फेल झाली. यामुळे प्रवशांना मनस्ताप सहन करावा लागला.

        बस क्रमांक एम.एच. ०६,एस. ८०४५ क्रमांकची बस गडचिरोली वरून धानोरा साठी निघाली असता काकडयेली येथे बसच इंजिन गरम झाल्याने इंजिन मधील पाणी बाहेर निघाल्याने बस ड्राइवरला बस काकडयेली तात्काळ थांबवावी लागली.

         त्यामुळे प्रवशांना रस्त्यावर थांबवे लागले.नेहमीच महामंडळच्या बसेस रस्त्यावर बिघाड झालेल्या अवस्थेत रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दिसतात.दोन दिवसापूर्वी सुद्धा राजोली फाट्यावर बस मध्ये बिघाड झाल्याने बस रस्त्यावर उभी होती.

           महामंडळच्या बसेस भंगार बसेस आहेत. त्यामुळे प्रवशांना नेहमीच भंगार बस गाड्याचा फटका बसत असतो.महामंडळांनी अशा बस गाड्या ऐवजी चांगल्या गाड्या प्रवाशांच्या सेवेत उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी प्रवाशी करीत आहे..