Home Maharashtra शासनाच्या जाचक अटी व नियमांच्या विरोधात कृषी केंद्र चालकांचा महाराष्ट्र बंद… ...

शासनाच्या जाचक अटी व नियमांच्या विरोधात कृषी केंद्र चालकांचा महाराष्ट्र बंद… — गडचिरोलि जिल्हातही बंदला समर्थन… — कुरखेडा ग्रामीण भागातही बंदचे पडसात… 

     राकेश चव्हाण 

कुरखेडा तालुका प्रतिनिधी 

        शासनाच्या जाचक अटी व नियमांविरोधात गडचिरोली जिल्ह्यातील सर्व कृषी सेवा केंद्रांनी बेमुदत बंदचे आंदोलन पुकारले आहे. राज्यभर सुरू असलेल्या या आंदोलनाला गडचिरोलीतील ग्रामीण भागातील कृषी केंद्रांनीही ठाम पाठिंबा दर्शवला असून, २७ एप्रिलपासून सर्व केंद्रे बंद ठेवण्यात आली आहेत.

         या आंदोलनामुळे शेतकऱ्यांना बियाणे, खते, कीटकनाशके यांसारख्या आवश्यक कृषी साहित्याचा पुरवठा ठप्प झाला आहे. सध्या खरीप हंगामाच्या तयारीचा कालावधी सुरू असल्याने शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक शेतकरी केंद्रांवर जाऊन परत येत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

          कृषी केंद्र चालकांचे म्हणणे आहे की, शासनाने लादलेल्या कठोर नियमांमुळे व्यवसाय करणे अवघड झाले असून, या अटींमध्ये तातडीने शिथिलता आणावी. अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

        दरम्यान, प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन लवकरात लवकर तोडगा काढावा, अशी मागणी शेतकरी व संबंधित घटकांकडून करण्यात येत आहे.