Home Maharashtra गोमाताचे संरक्षण व राष्ट्रमाता घोषित करा… — देशाचे सन्माननीय राष्ट्रपती,पंतप्रधान, राज्याचे...

गोमाताचे संरक्षण व राष्ट्रमाता घोषित करा… — देशाचे सन्माननीय राष्ट्रपती,पंतप्रधान, राज्याचे राज्यपाल,मुख्यमंत्री यांना तहसीलदारांना मार्फतीने निवेदन सादर…

     राकेश चव्हाण 

कुरखेडा तालुका प्रतिनिधि 

          गो सन्मान अभियानाच्या अंतर्गत संपूर्ण भारतभर गोमातेचे संरक्षण करून तिला “राष्ट्रमाता” घोषित करा या प्रमुख मागणीसह विविध मागण्या संदर्भात आज अभियान करण्यात आले त्याचाच भाग म्हणून कुरखेडा येथे तहसीलदारांमार्फतीने देशाचे राष्ट्रपती सन्माननीय द्रौपदी मुर्मू , देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तसेच राज्याचे सन्माननीय राज्यपाल जिस्णुजी देव वर्मा मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना निवेदन सादर करण्यात आले.

         निवेदन सादर करतांना ह.भ.प. मिश्रा महाराज ह. भ. प पुंडलिकराव नागपूरकर महाराज , नानाजी खुणे ,चांगदेव फाये उमेश वालदे सुखदेव कापगते, विनोद नागपूरकर, कृष्णाजी चंद्रमा , रमेश बावनथडे ,रुपाली कावळे, राहुल गिरडकर, बालू रहांगडाले, दिलीप कोनपत्तीवार, बळीराम पंधरे यांच्यासह गोप्रेमी व गोभक्त उपस्थित होते. या वेळी उपस्थितानी भारतीय संस्कृतीच्या जतनासाठी गोमातेचा सन्मान वाढविणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.

        गो सन्मान अभियानाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे अहिंसक मार्गाने व संविधानाच्या चौकटीत राहून गाईला राष्ट्रीय स्तरावर सन्मान मिळवून देणे हे आहे. यासाठी केंद्र व राज्य सरकारांनी पुढील मागण्या तातडीने पूर्ण कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.

         या निवेदनाद्वारे शासनाने लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा गोप्रेमी बांधवांनी व्यक्त केली आहे.