ऋषी सहारे
संपादक
आरमोरी – बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी कॉ. गोविंद पानसरे यांचा अपमान करून त्यांच्या पुस्तकाचे प्रकाशक काॅ.प्रशांत आंबी यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाड करून जिवंत मारण्याची धमकी दिल्याने आमदार संजय गायकवाड यांच्यावर फौजदारी कारवाई करून अटक करा.आणि त्याला विधानसभेतून निलंबित करण्यात यावे.अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पार्टी गडचिरोली जिल्हा कौन्सिल च्या वतीने निवेदन देवेंद्र फडणवीस,मुख्यमंत्री , महाराष्ट्र राज्य यांना तहसिलदार उषाताई चौधरी आरमोरी यांचे मार्फत पाठविण्यात आले.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे दिवंगत नेते तसेच संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील एक अग्रणी नेते शहीद काँ. गोविंद पानसरे यांनी लिहिलेल्या शिवाजी कोण होता ? या पुस्तकाबद्दल दि. २२ अप्रिल ला शिवसेना शिंदे गटाचे बुलठाण्याचे आमदार संजय गायकवाड नावाच्या बिनडोक आमदाराने वाद निर्माण केलेला आहे.
त्याचप्रमाणे काॅ.गोविंद पानसरे यांच्या बद्दल अपशब्द बोलून अवमान करीत आक्षेपार्ह विधाने केली.तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा देखील अपमान केलेला असून या पुस्तकाचे प्रकाशक ऑल इंडिया स्टूंडन्ट फेडरेशनचे माजी राज्य सचिव काॅ. प्रशांत आंबी,कोल्हापूर यांचेशी फोनवर वाद घालून अश्र्लील भाषेत शिवीगाड करीत त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना घरात घुसून जीवे मारण्याची धमकी दिली आहे.
लेखक व प्रकाशक म्हणून विचार मांडणाऱ्या व्यक्तींना धमक्या देऊन गप्प बसविण्याचा प्रयत्न हा संविधानीक मुल्यांवर थेट आघात आहे.असे वर्तन लोकशाही देशांमध्ये लोकशाही विरोधी असून अशा पद्धतीचे संजय गायकवाड यांचे असे वर्तन हे निषेधार्थ व हुकूमशाही वृत्तीचे अणि लोकशाही परंपरेला काळीमा फासणारे आहे. या प्रकरणाची मुख्यमंत्री यांनी जातीने त्वरित लक्ष देवून चौकशी करावी.त्यांचा आमदारकीचा तातडीने राजीनामा घ्यावा. त्यांच्यावरती गुन्हा नोंद करून त्यांना अटक करावी.
अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा येईल.असा इशारा देण्यात आलेला आहे.अशी मागणी करण्यात आली.सदरील निवेदन देतांना भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे राज्य सचिव मंडळ सदस्य तथा महाराष्ट्र राज्य किसान सभेचे राज्य कार्याध्यक्ष,काॅ.डॉ. महेश कोपुलवार भारतीय कम्युनिस्ट पार्टी गडचिरोली जिल्हा सहसचिव काॅ.ॲड. जगदीश मेश्राम , तालुका सचिव काॅ.प्रकाश खोब्रागडे , ऋषी रामटेके, प्रशांत खोब्रागडे,काॅ .मीनाक्षी सेलोकर ,गोविंदा मेश्राम तसेच सदस्य, कार्यकर्ते इत्यादी प्रामुख्याने उपस्थित होते.



