Home Maharashtra चार दिवस उलटले, तरी सफाई कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू, कचरा उचल करण्याच्या निविदेतील...

चार दिवस उलटले, तरी सफाई कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू, कचरा उचल करण्याच्या निविदेतील तांत्रिक अडचणी चा घोळ, नगर पंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष…

     राकेश चव्हाण 

कुरखेडा तालुका प्रतिनिधी 

         कुरखेडा नगरातील सफाई कर्मचाऱ्यांचे थकीत वेतनाच्या मागणीसाठी सुरू असलेले आंदोलन चार दिवस उलटूनही अद्याप सुरूच आहे. प्रशासनाकडून एका महिन्याचे वेतन बचत गटाच्या खात्यात जमा न करता नगदी देण्यात आले ही बाब संदेहस्पद आहे.

         महिला बचत गटाला अधिकृतरित्या घन कचरा उचल करण्याचं टेंडर दिल्या नंतर ही त्यांची रक्कम नगदीस्वरूपात देण्याचे कारण काय असा सवाल उपस्थित केला जात आहे! माहिती घेतली असता टेन्ड़र प्रक्रियेत काही तांत्रिक अडचणी आहेत.

       करिता नविन प्रभारी मुख्याधिकारी यानी रक्कम वळती केली नसल्याचे कळते.जर टेंड़र प्रक्रिया कायद्याला अनुसरुन असेल तर सफाई कर्मचारी यांचे वेतन द्यायला कोणती अडचण आहे असा सवाल उपस्थित केला जात आहे.

          कर्मचाऱ्यांचे एका महिन्याचे वेतन अद्याप मिळाले नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे व असंतोष्पूर्ण वातावरण आहे.

         सफाई कर्मचाऱ्यांनी सांगितले की, “आम्हाला आमचे पूर्ण हक्काचे वेतन वेळेवर मिळणे गरजेचे आहे. एका महिन्याचे पैसे मिळाले, मात्र अजून एका महिन्याचे वेतन बाकी आहे. त्यामुळे आमच्यावर आर्थिक ताण वाढत आहे.”

          दरम्यान, आंदोलनामुळे शहरातील स्वच्छता व्यवस्थेवर परिणाम होत असून घंटा गाड्या वार्डात कचरा संकलन करिता जाणे बंद आहे. कचऱ्याचे ढिग साचल्याचे चित्र दिसून येत आहे त्यावर नगर पंचायत प्रशासनाने तात्पुरता तोडगा काढत ईतर कंत्राटी कामगार कडून कचरा संकलन सुरु केले आहे. लवकरात लवकर तोडगा काढण्याची मागणी होत आहे.

        प्रशासनाने या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देऊन उर्वरित वेतन तात्काळ देण्याची आणि आंदोलनाचा मार्ग काढण्याची गरज व्यक्त केली जात आहे.