Home Maharashtra प्रजासत्ताक दिनाच्या गित गायन कार्यक्रमात आयोजकांना पडला महापुरुषांच्या प्रतिमेचा विसर, पोलिस प्रशासनावर...

प्रजासत्ताक दिनाच्या गित गायन कार्यक्रमात आयोजकांना पडला महापुरुषांच्या प्रतिमेचा विसर, पोलिस प्रशासनावर वंचित बहुजन आघाडीचा पत्रकार परिषदेतून संताप, आंदोलनाचा इशारा…

युवराज डोंगरे 

  उपसंपादक 

खल्लार :- प्रत्येक भारतीयांसाठी अभिमानाचा आणि आत्मसन्मानाचा व देशाच्या संविधानाला अभिवादन करणारा प्रजासत्ताक दिन काल मोठया उत्साहात देशभर साजरा करण्यात आला.

             मात्र दर्यापूर पोलिस स्टेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या गित गायन कार्यक्रमात भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर व इतर महापुरुषांच्या प्रतिमा लावण्याचा विसर पडल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे दर्यापूर तालुकाध्यक्ष चंदू रायबोलें यांनी पत्रकार परिषदेतून केला असून याबाबत आंबेडकरी अनुयायांमध्ये दर्यापूर शहरांसह तालुक्यामध्ये तीव्र नाराजी व्यक्त केल्या जात आहे.

            वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष चंदू रायबोले यांनी पोलिस प्रशासनाच्या या दुर्लक्षावर कठोर भूमिका घेतली असून प्रजासत्ताक दिन हा केवळ औपचारिक सोहळा नसून तो संविधानिक मूल्यांचा व सामाजिक समतेचा आणि लोकशाही व्यवस्थेचा उत्सव आहे.या दिवशी संविधान निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना मानाचे स्थान न देणे हे केवळ दुर्लक्ष नव्हे संविधानिक विचारधारेचा अपमान असल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होते. 

           आज (दि. 27) शासकीय विश्रामगृह दर्यापूर येथे पत्रकार परिषद घेऊन चंदू भाऊ रायबोले यांनी संताप व्यक्त करुन बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानामुळेच आज देशात लोकशाही स्वातंत्र्य समानतेची संकल्पना अस्तित्वात आहे अशा महामानवांच्या प्रतिमेचा प्रजासत्ताक दिनी गित गायनाच्या आयोजित कार्यक्रमात विसर पडणे हे अत्यंत गंभीर बाब आहे.

            हा प्रकार प्रशासनाच्या असंवेदनशिलतेला घातक आहे या बाबत वरिष्ठ प्रशासनाने गंभिर दखल घेऊन आयोजकांवर गुन्हे दाखल करण्यात यावे व भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी ठोस उपाय योजना कराव्या नाहीतर वंचित बहुजन आघाडीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा प्रशासनाला दिला आहे.

           या प्रकरणामुळे शहरात सामाजिक व राजकीय वर्तुळात चर्चा रंगली असून अनेकांनी या घटनेवर नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत पोलिस प्रशासनाकडून अद्याप कोणतेही अधिकृत प्रतिक्रिया आली नसून पुढील घडामोडीवर सर्वांचे लक्ष लागले आहे. या पत्रकार परिषदेला वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष सलिमभाई जमादार, दर्यापूर तालुकाध्यक्ष चंदू रायबोले,सुनिल चौरपगार व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

बॉक्स

           प्रजासत्ताक दिनी ग्रामपंचायत कार्यालय येवदा येथे सुद्धा महापुरुषांचा प्रतिमेच्या अपमानाबद्दल चांगलाच वाद उफाळून आला होता. याच घटनेची पुनरावृत्ती दर्यापूर पोलिस स्टेशनमध्ये आयोजित गित गायनाच्या कार्यक्रमातून दिसून येत असल्याची वंचित बहुजन आघाडीने तालुकाध्यक्ष यांनी व्यक्त केले आहे.