धानोऱ्यात विविध ठिकाणी ध्वजारोहण व विविध कार्यक्रमाचे आयोजन… 

 भाविक करमनकर 

धानोरा तालुका प्रतिनिधि 

          26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त धानोरा शहरात विविध शाळा महाविद्यालय ध्वजारोहण करण्यात आला. यात जे एस पी एम महाविद्यालयात प्राचार्य डॉ. पंकज चौहान सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

         नगरपंचायत कार्यालय धानोरा येथे अध्यक्ष नगरपंचायत पौर्णिमा सयाम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.तसेच ग्रामीण रुग्णालय धानोरा येथे ध्वजारोहण करण्यात आले. तसेच विविध शाळा महाविद्यालयात ध्वजारोहण करण्यात आले. या नंतर शहरातील मुख्य ध्वजारोहणाचा कार्यक्रम तहसील कार्यालय येथे पार पडला.

          तहसील कार्यालयाचा ध्वजारोहण धानोऱ्याचे तहसीलदार राहुल पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. ध्वजारोहणा नंतर विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे व देशभक्ती गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या स्पर्धेमध्ये धानोरा शहरातील विविध शाळा महाविद्यालयानी भाग घेतला व विजेत्या स्पर्धकांना बक्षीस देण्यात आले. 

            धानोरा येथील नगरसेवकानी मुख्य ध्वजारोहण व सांस्कृतिक कार्यक्रमासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी नगरपंचायत उपाध्यक्ष ललित बरच्छा व मलिक बुधवानी यांच्या पुढाकातून सर्व नगर सेवकांनी मसाला भात व बुंदी चे वाटप करून नागरिकांना नाश्त्याची सोय करून दिली. त्यामुळे नागरिकांनी त्यांचे आभार मानले धानोरा शहरातील वातावरण देशभक्ती मय झाले होते.