विरोधी पक्षनेते यांची सिंदेवाहीची आढावा बैठक पत्रकाराविणा… — पंचायत समितीचे ढिसाळ नियोजन.. — पं. स .चा भ्रष्ट्राचार वर्तमान पत्रातून उघड होण्याची भीती…

 

अमान क़ुरैशी

जिल्हा प्रतिनिधि

दखल न्यूज भारत

 

सिंदेवाही :- महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची सोमवारी पार पडलेली सिंदेवाही येथील आढावा बैठकीचे तालुक्यातील एकाही पत्रकारांना निमंत्रण नसल्याने आढावा बैठकीत पंचायत समितीचा भ्रष्ट्राचार बाबत विरोधी पक्षनेते बोललेले वर्तमान पत्रातून प्रसिद्ध होतील या भीतीने गट विकास अधिकारी यांनी कोणत्याच पत्रकारांना बैठकीला बोलाविले नाही. आणि त्यामुळे कोणताही पत्रकार बैठकीकडे फिरकले नसल्याने विरोधी पक्षनेते तथा आमदार विजय वडेट्टीवार यांची आढावा बैठक पत्रकारा विना पार पडली.

                राज्याचे विरोधी पक्षनेते तथा आमदार विजय वडेट्टीवार हे ब्रम्हपुरी, सावली, सिंदेवाही या विधानसभा क्षेत्राचे आमदार असून जनतेच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी दर तीन महिन्यांनी तालुक्याची आढावा बैठक घेऊन प्रत्येक विभागाच्या अधिकारी वर्गाना नागरिकांच्या समस्या बाबत अडचणी विचारून समस्या निकाली काढल्या जातात. दरम्यान सोमवारी दुपारी १२ वाजता सिंदेवाही तालुका आढावा बैठक पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित करण्यात आली. या बैठकीचे नियोजन पंचायत समिती सिंदेवाहिचे गट विकास अधिकारी यांचेकडे देण्यात आले.

      त्या नुसार त्यांनी पंचायत समिती मार्फत तालुक्यातील सर्व सरपंच, ग्रामसेवक, तालुका कृषी विभाग, पंचायत समिती अंतर्गत असलेले बांधकाम विभाग, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, घरकुल विभाग, ग्रामीण रोजगार हमी विभाग, महिला बालकल्याण विभाग, शिक्षण विभाग, पशू वैद्यकीय विभाग, कृषी विभाग, सार्वजानिक बांधकाम विभाग, वीज वितरण विभाग, यासह इत्यादी सर्व विभागाच्या प्रमुखांना या बैठकिमध्ये उपस्थित राहण्यासाठी कळविण्यात आले. मात्र लोकशाहीचा चवथा स्तंभ समजल्या जाणाऱ्या पत्रकार मंडळीना या आढावा बैठकीला उपस्थित राहण्यासाठी माहिती देण्यात आली नाही. आढावा बैठकीत जर पत्रकार उपस्थित राहिल्यास विरोधी पक्षनेते यांनी पंचायत समितीच्या भ्रष्ट्राचार बाबत बोलले, तर त्याची माध्यमातून प्रसिद्धी होऊ नये. कदाचित हा उद्देश ठेऊन गटविकास अधिकारी यांनी तालुक्यातील कोणत्याही पत्रकारांना आढावा बैठकीची माहिती दिली नसावी. यापूर्वी झालेल्या प्रत्येक आढावा बैठकीचे पत्रकारांना निमंत्रण असायचे. मात्र या बैठकीचे गट विकास अधिकारी यांनी जाणीवपूर्वक निमंत्रण दिले नसल्याने राज्याचे विरोधी पक्षनेते तथा आमदार विजय वडेट्टीवार यांची आढावा बैठक पत्रकार विनाच पार पडली.