इंद्रायणी नदी प्रदूषण रोखण्यासाठी शिवसेनेतर्फे दोन ठिकाणी विसर्जन कुंड उपलब्ध…

दिनेश कुऱ्हाडे

उपसंपादक

आळंदी : इंद्रायणी नदी प्रदूषण रोखण्यास व श्री गणेश मूर्ती दान करण्यासाठी आळंदी येथील चाकण चौक वाहनतळ या ठिकाणी तसेच वैतागेश्वर मंदिर विश्वरूप दर्शन मंच मागे अशा दोन ठिकाणी गणेश मूर्ती दान व विसर्जन कुंड ठेवण्यात येणार असल्याचे आळंदी शहर शिवसेना  प्रमुख राहुल चव्हाण यांनी सांगितले.

         तीर्थक्षेत्र आळंदी येथील इंद्रायणी नदीचे जलप्रदूषण रोखण्यासाठी व उपाय योजना अंतर्गत श्री आळंदी धामसेवा समिती व शिवसेना आळंदी शहर यांचे वतीने इंद्रायणी नदी घाटावर श्री गणेश विसर्जन कुंड भाजी मंडई तसेच विसर्जन कुंड वैतागेश्वर मंदिर लगत उपलब्ध करण्यात आले आहेत. यासाठी सुमारे पाच हजार लिटर क्षमतेची ही दोन कुंडे तयार करण्यात आली असून,या ठिकाणी श्रींचे विसर्जन करून श्रींची मूर्ती दान स्वरूपात स्वीकारून त्या सर्व मुर्त्या आळंदी नगरपालिकेकडे सुपूर्त करण्यात येणार असल्याचे श्री आळंदी सेवा धाम समितीचे संस्थापक अध्यक्ष राहुल चव्हाण यांनी सांगितले यासाठी शास्त्र युक्त पद्धतीने देवा ब्राह्मणांच्या साक्षीने पूजा करण्यात येऊन उपक्रमास सुरुवात करणार आहोत. यासाठी स्वयंसेवक तैनात करण्यात आले असून पाच हजार लिटर क्षमतेची दोन विसर्जन कुंड तसेच एक पाण्याचा टँकर देखील उपलब्ध करून देण्यात आला आहे.

        यावेळी राहुल चव्हाण, सचिन शिंदे, रुपेश लोखंडे, संकेत वाघमारे, नितीन ननवरे, साईनाथ ताम्हाणे, ज्ञानेश्वर शेखर आदी उपस्थित होते.