Home देशविदेश त्या टाॅवर च्या कामाला कायदेशीर मान्यता खरोखरच मिळाली आहे काय? —...

त्या टाॅवर च्या कामाला कायदेशीर मान्यता खरोखरच मिळाली आहे काय? — जांभुळघाट ग्रामपंचायतीच्या बोर्डावर टाॅवर बांधकामाच्या मंजुरी संबंधाने सर्व कागदपत्रे सार्वजनिक करण्यात आलीत काय?

   उपक्षम रामटेके 

मुख्य कार्यकारी संपादक 

       चंद्रपूर जिल्हातंर्गत चिमूर तालुक्यातील मौजा जांभुळघाट येथे एअरटेल टाॅवर उभारणी बांधकामाच्या अनुषंगाने हालचालीला संबंधित ठेकेदारांकडून सुरुवात झालेली आहे.

       मात्र,मोबाईल टाॅवर उभारणी चे काम हे गावापासून २ किलोमीटर अंतरावर असावे हा नियम आहे.

          आणि गावात मोबाईल टाॅवरच्या उभारणीचे काम करावयाचे असल्यास मोबाईल टाॅवर उभारणी बांधकामाच्या संबंधाने जवळपासच्या नागरिकांची लेखी स्वरूपात संमती घेणे आवश्यक आहे.

        याचबरोबर जवळपास शाळा व दवाखाने असल्यास संबंधित डाॅक्टर,मुख्याध्यापक यांचे नाहरकत प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे.

        कारण मोबाईल टाॅवर मुळे जवळपासच्या नागरिकांना,विद्यार्थ्यांना,रुग्णांना कालांतराने बहिरेपणा येतो व अंगामध्ये बधीरपणा येतोय.

        याचबरोबर पशुपक्षी आणि नैसर्गिक साधनसंपत्तीवर मोबाईल टाॅवरचे दुष्परिणाम पडतात हे वास्तव आहे.

           जवळपासच्या नागरिकांची,डाॅक्टरांची व मुख्याधापकांची मोबाईल टाॅवर उभारणीसाठी लेखी मंजुरी नसल्यास मौजा जांभुळघाट येथे मोबाईल एअरटेल कंपनीचे टाॅवर कसे काय टाॅवर उभारले जात आहे?हा प्रश्न अनेक बाबतीत गांभीर्य निर्माण करतो आहे.

        मोबाईल टॉवर उभारण्यासाठी महानगरपालिका,जिल्हा परिषद आणि नगर रचना विभागाकडून मान्यता घेणे आवश्यक आहे,तसेच शाळा,रुग्णालये,आणि दाट लोकवस्ती असलेल्या भागांमध्ये टॉवर उभारण्यासाठी विशेष नियम आहेत आणि यासाठी रहिवाशांचीही संमती आवश्यक असू शकते.

        टॉवर कंपन्यांनी दूरसंचार विभागाच्या नियमांनुसार अर्ज करून,आवश्यक कागदपत्रे व मंजुऱ्या मिळवणे बंधनकारक आहे.

 मान्यता मिळवण्यासाठी प्रक्रिया….

1. स्थानिक प्राधिकरणाकडे अर्ज करावे लागतय…

             प्रथम संबंधित नगर पालिका,जिल्हा परिषद किंवा संबंधित स्थानिक प्रशासनाकडे टॉवर उभारण्यासाठी अर्ज करावा लागतो. 

2. नियम आणि मार्गदर्शक तत्त्वे तपासा….

           मोबाइल टॉवर उभारणीसाठी राज्य आणि केंद्र सरकारच्या नियमावली आहेत,ज्यांचे पालन करणे आवश्यक आहे. 

3. आवश्यक कागदपत्रे सादर करा…

       १) प्रस्तावित जागेचा नकाशा,साइट प्लॅन,आणि ब्लॉक प्लॅन. 

      २) मालकी हक्काचे कागदपत्र. 

      ३) टॉवरची उंची आणि डिझाइनची माहिती. 

     ४) विद्युत तारांपासून सुरक्षित अंतर दर्शवणारे दस्तऐवज. 

        4.अंतिम मंजुरीची प्रक्रिया…

       सर्व अर्ज आणि कागदपत्रांची तपासणी झाल्यानंतर,जर सर्व अटी पूर्ण झाल्या असतील,तर प्रशासनाकडून टॉवर उभारण्यासाठी अंतिम मंजुरी दिली जाते. 

विशेष नियम आणि अटी…

        शाळा,रुग्णालये आणि शैक्षणिक संस्था,या संस्थांच्या १००-१५० मीटर परिसरात टॉवर उभारण्यास मनाई आहे. 

दाट लोकवस्तीचे क्षेत्र….

       अशा ठिकाणी विशेष मंजुरी आणि समुदायाची संमती आवश्यक असते. 

सहकारी गृहनिर्माण संस्था…

       येथे किमान ७०% रहिवाशांची परवानगी आवश्यक आहे. 

इमारतीच्या टेरेसवर टॉवर…

      यासाठी आवश्यक परवानग्या व नियमांचे पालन करणे महत्त्वाचे आहे,अन्यथा उच्च न्यायालये अशा बेकायदेशीर टॉवर्सवर कारवाई करू शकतात. 

किरणोत्सर्गाची माहिती…

     नवीन नियमांनुसार,टॉवरमधून होणारा किरणोत्सर्ग आणि त्याचे प्रमाण याची माहिती देणे आवश्यक आहे. 

महत्त्वाचे काम…

        टॉवर कंपन्यांशी थेट संपर्क साधणे,स्थानिक प्रशासनाकडे चौकशी करणे,दूरसंचार विभागाच्या वेबसाइटला भेट देणे.