“पोलिस काका पोलीस दीदी”,’मोटिवेशनल स्पीच… — “भविष्याची वाटचाल,या विषयावर जवाहर नवोदय विद्यालय नवेगाव खैरी येथे कार्यक्रम संपन्न…

 

    कमलसिंह यादव 

तालुका प्रतिनिधी पारशिवनी 

पारशिवनी :- उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.आशीत कांबळे,सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी रामटेक विभाग रामटेक यांच्या प्रमुख उपस्थितीत व श्री राहुल सोनवणे पोलीस निरीक्षक पारशिवनी यांचे  देखरेखी खाली,नवोदय विद्यालय नवेगाव खैरीच्या प्राचार्य डॉ. झरीना कुरेशी यांच्या अध्यक्षतेखाली व म.पो.हवा स्नेहलता ढवळे सायबर पोलीस स्टेशन नागपूर ग्रामीण,म.पो.अं. पल्लवी रेहपाळे वाहतूक शाखा नागपूर ग्रामीण यांनी सायबर क्राईम,वाहतूक नियमन,यांच्या उपस्थितीत,”पोलीस काका पोलीस दीदी,”मोटिवेशनल स्पीच,”भविष्याची वाटचाल,या विषयावर जवाहर नवोदय विद्यालय नवेगाव खैरी ता. पारशिवनी येथे आज कार्यक्रम घेण्यात आला.

        सदर कार्यक्रमांमध्ये मान्यवरांनी सविस्तर मार्गदर्शन केले.विद्यार्थ्यांना त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी,त्यावर उपाययोजना व घ्यावयाची खबरदारी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

         उपविभागीय पोलिस अधिकारी आशित कांबळे,(भा.पो.से.)यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहनस्पर माहिती देऊन प्रोत्साहित केले.

         सदर कार्यक्रमास विद्यार्थी- शिक्षक वृंदांनी सक्रिय सहभाग नोंदविला होता.