टॉवर वर बसलेला डॉन.. — जन माणसांना डोकेदुखी.. — तडीपारची कारवाई करा… — दारूमुळे उध्वस्त कुटुंबांची मागणी..तडीपार करा..तडीपार करा…

ऋषी सहारे

संपादक

आरमोरी – तालुका शिक्षणाचे माहेरघर आहे पण येथे मोठ्या प्रमाणात अवैध धंदे चालत असल्याने तालुक्याची प्रतिमा मलिन होत आहे म्हणूनच जन माणसात एकच सुर निघतो की अशा डॉन ला तडीपार च करा. जेणे करून तालुक्यातील व्यसनी लोकांना व्यसन राहणार नाही व सुदृढ जीवन व्यतित करतील.

          आरमोरी टॉवर वर असलेला डॉन संपूर्ण तालुक्याला देशी व मोहफुला ची दारू सप्लाय करतो, नाममात्र मोठी दुकान लावून सर्व फिल्डींग तिथून हॅण्डल करतो.

        सर्व हप्तेखोर तिथून हप्ते उचल करतात व डॉन आपली दादागिरी करत मोकळा असतो.

         तालुक्यातील सर्व जनता बोंबा मारते पण हप्तेखोरा मूळ डॉन अधिक मजबूत होऊन माझं कोण काय करतो या तोऱ्यात वावरत आहे.

        देशी व मोहफुलाची दारू पिऊन अनेक कुटुंब उध्वस्त झालेले आहेत त्या सर्वाची एक मुखी मागणी आहे की तडीपार करा..तडीपार करा..

         मुळावर घाव घातला तर फांद्या आपोआप गळून पडतात तसेच या डीलर सप्लायर ला तडीपार करा तर काही अंशितरी दारू बंद होईल.सर्व जनतेचे लक्ष लागून आहे की या संदर्भात सबंधित विभाग काय कारवाई करणार?

                    ———- क्रमशः