आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्याहस्ते गरजूंना विविध कार्ड वाटप… ‘एक हात मदतीचा उपक्रम’…

डॉ.जगदीश वेन्नम

  संपादक

सिरोंचा:-तालुक्यातील विविध गावांतील तब्बल शंभर गरजू नागरिकांना अहेरी विधानसभा क्षेत्राचे आ धर्मराव बाबा आत्राम यांच्याहस्ते आभा कार्ड,ई श्रम कार्ड,पॅन कार्ड वाटप करण्यात.

          राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा विद्यमान आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी युवती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम व सिनेट सदस्य तनुश्री ताई आत्राम यांच्या नेतृत्वात गडचिरोली जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा ‘एक हात मदतीचा’ उपक्रम सुरू आहे.मागील एक वर्षांपासून सुरू असलेल्या या उपक्रमांतर्गत जिल्हाभरातील गरजू नागरिकांना विविध कार्ड तयार करून मोफत वाटप केले जात आहे.

          या उपक्रमांतर्गत जिल्हाभरातील खेड्यापाड्यातील नागरिकांना मोठा फायदा झाला आहे. शासकीय योजनांसाठी लागणारे विविध कार्ड तयार करून मिळावे या उदात्त हेतूने सिरोंचा तालुक्यातील महिला,पुरुष,युवक आणि युवतींनी कागदपत्र जमा केले होते.अवघ्या काही दिवसांतच विविध कार्ड तयार करून आ धर्मराव बाबा आत्राम यांच्या शुभहस्ते नुकतेच वाटप करण्यात आले.

        विविध कार्यालयात अनेकदा चकरा मारूनही असे कार्ड वेळेवर मिळत नव्हते मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस कडून सुरू असलेल्या उपक्रमातून येथील नागरिकांना त्वरित विविध कार्ड तयार करून मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केला आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सिरोंचा तालुकाध्यक्ष मधुकर कोल्लूरी,एम डी शानु,रवी सुलतान,फिरोज खान,मदानायय्या मादेशी,नागराज गणपती,वेंकटेश गडपूरपवार आदी मान्यवर उपस्थित होते.