Home देशविदेश बदला घेणे म्हणजे जिंकणे नव्हे…

बदला घेणे म्हणजे जिंकणे नव्हे…

       आम्हाला निवडून द्या कारण काँग्रेसला दहशतवाद आणि नक्षलवाद नष्ट करता आला नाही,तो आम्ही करून दाखवू असे आश्वासन देऊन भाजपा सत्तेत आली,परंतु 12 वर्ष झाली तरी दहशतवाद आणि नक्षलवाद नष्ट तर झालाच नाही पण त्याच्या कारवाया , हल्ले पण थांबले नाहीत.केवळ हाच विषय घेऊन मतदारांनी भाजपला ” तुम्ही यात अपयशी ठरलाय” म्हणून भाजपला सत्ता देणे नाकारायला हवे होते,परंतु अडाणी देवभोळे अंधश्रद्धाळू गरीब स्वार्थी विसराळू हे दुर्गुण असलेले भारतीय मतदार भाजपाने दिलेले दहशतवाद नष्ट करण्याचे आश्वासन विसरले,आणि धर्मांध होऊन भाजपला मते दिली,आणि परत त्यांचेच हातात सत्ता दिली.

        दहशतवादी कारवाया होतच राहिली,त्यास तोंड देतच राहिलो,यास आम्ही ” बदला घेतला ” या भ्रमाचा आनंद घेत राहिलो,आणि बदल्यांचा विजयोत्सव करीत राहिलो,ही प्रथाच आम्ही पाडली.खरे तर बदल्यांची भावना विचार आणि कृती म्हणजे विजय नव्हे तर पराभवच होय असे मला वाटते,कारण बदला घेणे हे शहाणपणाचे लक्षण नसते,सज्जनांचे ते काम नव्हे,दुर्जन लोकच बदल्याचे युद्ध छेडीत असतात.

         सज्जन मात्र त्यावर उपाय शोधतात.आम्ही अजूनही उपाय शोधत नाही, उपायची कृती तर दूरच.असे हे अजून किती दिवस किती वर्ष चालणार? चालवणार? चालू देणार? चालवायचे? की हे बंद करायचे? यावर विचार होणे गरजेचे आहे.कारण या दहशतवादी आणि नक्षलवादी कारवायांनी हजारो नागरिक पोलिस सैनिक बळी जात आहेत,या मृतदेहाचा ” देशाची एकी,भक्ती,निष्ठा,जवानांचे शौर्य धैर्य पराक्रम म्हणत किती दिवस काढायचे? आणि अजून किती जीव द्यायचे आणि घ्यायचे? हे माणुसकीला धरून आहे का? हा मानवताधर्म का? हेच विश्वबंधुत्व का? हेच विश्वाची माझे घर का? हीच का विश्वशांती? 

         खरेच विश्र्वशांती आणि देशशांती हवी असेल तर या चुटुपुटूच्या लढाया करून नाही चालणार , देशात शांतता हवी असेल तर आरपारचीच लढाई लढावी लागेल,एकदाच काय तो सोक्षमोक्ष करावा लागेल,एकवेळ म्हातारी मेली तरी चालेल पण काळ शोक ता कामा नये.

          पहलगाम दहशतवादी हल्ल्यात आपले 28 पर्यटक नागरिक ठार झाले,त्याचा बदला घेतला म्हणून आज तिरंगा रॅली काढून विजयोत्सव साजरा करीत आहोत,हे किती हास्यास्पद आहे,याचा अर्थ आपणच आपली पाठ थोपटणे होय.कारण दहशतवादी येऊ देणे,त्यांना न पकडणे,त्यांना मारण्याऐवजी दुसऱ्याच दहशतवाद्यांना मारणे,त्यांचे अड्डे नष्ट करणे म्हणजे त्यातील किती दहशतवादी मारले? याचा आकडा न मिळणे,पाकिस्तान ने युद्ध सुरू केले म्हणून आपण तोडीसतोड उत्तर देणे,यात आपले आणि त्यांचेही जवान मरणे,आपल्या शस्त्रांचा नाश होणे ,शेवटी निष्पन्न काय तर “युद्ध बंदी” कुणी केली? सैन्याला अधिकार दिला होता त्याचे पालन केले का? सैन्यानी युद्धबंदी केली का? पाकिस्तान्यांनी माघार घेतली, शरण आले ,असे घडले का? नाही.मग मोदी साहेबांनी ट्रम्प साहेबापुढे गुडघे का टेकले? त्यांचे ऐकून माघार का घेतली? म्हणे मोदींनी व्यापाराची धमकी दिली,आणि त्या धमकीला मोदीजी भ्यायले. का भ्यायले? की त्यांना देशाच्या इज्जतीपेक्षा व्यापार महत्वाचा वाटला,अदानी मित्राचा भ्रष्टाचाराच्या अमेरिकेतील केसचा निकाल महत्वाचा वाटला? एका मित्रासाठी आख्या देशाला वेठीस धरणे,अमेरिकेच्या धमकीची भीती बाळगणे म्हणजेच यातून मोदींचा स्वार्थ आणि दर्पोकपणा सिद्ध होतो,मोदींवर विश्वास ठेऊन एक बहाद्दर प्रधानमंत्री म्हणून जनतेनी त्यांचेवर विश्वास ठेवला,पण त्यांनी जनतेचा देशाचा विश्वासघातच केला,असेच म्हणावे लागेल,कारण आता दहशतवाद मातीत गढल्याशिवाय राहणार नाही,असे आश्वासन देऊन पाकिस्तानशी युद्ध पुकारले.

            बहाद्दर सैन्याने ते चॅलेंज स्वीकारले.पाकिस्तान जिंकणे सोपे आहे,हे कळून चुकले. लढाई सुरू झाली,आपले बहाद्दर जवान जीवाची पर्वा न करता लढत होते,धारातीर्थी पडत होते,आपले अत्याधुनिक शस्त्र पण कामी येत होती,यामुळे लढाई जिंकणे सोपे होते,पाकिस्तानचा नकाशा भूतलावर दिसणारच नव्हता,ते भारतात विलीन होणार होते,पाकिस्तानी सैनिक प्रधानमंत्री हे शरण येणार होते,अखंड भारताचे आर एस एस चे स्वप्न साकार होणार होते,दहशतवाद कायमचा संपणार होता,अशी परिस्थिती आणि वेळ आणि संधी चालून आलेली असताना देशाच्या प्रधानमंत्र्यांनी आणि त्यांच्या मंत्रिमंडळानी ट्रम्प ची धमकी येताच माघार घ्यावी, म्हणजे हा पराभवच नव्हे का? 

           तरी ह्या विजयोत्सवाच्या सभा म्हणजे बेशरमपणाची हद्द ओलांडणे च होय.जिंकण्याचा विजयोत्सव करायचा ही प्रथा आहे,पण पराभवाचा विजयोत्सव साजरा करणे ही एक नवीच परंपरा हा भाजपा पक्ष निर्माण करतो आहे,हे शहाण्या नागरिकांना आणि विचारवंताना सांगणे न लगे.

       लेखक : दत्ता तुमवाड

         सत्यशोधक समाज नांदेड

दिनांक : 26 मे 2025. फोन : 9420912309.