आरमोरी व देसाईगंज शिक्षक भरती घोटाळा प्रकरण गाजणार- सपाटे

पंकज चहांदे

दखल न्यूज भारत

देसाईगंज

    शिक्षक भरती घोटाळा प्रकरणी गोंदिया येथील शिक्षणाधिकाऱ्यांवर तब्बल २.६२ कोटींची रिकव्हरी काढण्यात आली. तर भरती बंद असतांना घेतलेल्या ४८ नियुक्त्या सुद्धा रद्द करण्यात आल्याने गोंदियाच्या धर्तीवर गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी व देसाईगंज येथील शिक्षक भरती घोटाळा प्रकरण गाजणार असल्याची माहिती तक्रारकर्ता सामाजिक कार्यकर्ते मिलींद सपाटे यांनी दिली.

     सपाटे यांनी सांगितले की, महाराष्ट्र शासनाने वर्ष २०१२ पासुन राज्यातील शिक्षक भरती बंद केली होती, परंतु काही संस्था चालकांनी मंत्रालयातून बनावट मान्यता आणून मोठया प्रमाणात बोगस शिक्षक भरती केली होती. यात लाखो रुपयांची देवाण – घेवाण झाल्याचा आरोपही सपाटे यांनी केला. गोंदिया प्रमाणेच गडचिरोली जिल्ह्यातील व विशेष करून आरमोरी व देसाईगंज येथील शिक्षक भरती घोटाळ्याची चौकशी केल्यास अनेक बाबी समोर येणार.

    सध्या राज्यात शिक्षक भरती घोटाळे उघडकीय येत असल्याने अनेक संस्थाचालकांनी प्रकरण दडपण्याकरीता प्रयत्न चालविले असल्याने गडचिरोली जिल्ह्यातील शिक्षक भरती प्रकरणाची अद्यापही पाहिजे तशी चौकशी सुरू झाली नसल्याने आता तक्रारकर्ते सामाजिक कार्यकर्ते मिलींद सपाटेच सुशिक्षीत बेरोजगार युवकांवर झालेला अन्याय दुर करण्याकरीता गडचिरोली जिल्ह्यातील व खास करून आरमोरी व देसाईगंज तालुक्यातील शिक्षक भरती घोटाळा प्रकरण गाजवणार असल्याची माहिती मिलींद सपाटे यांनी प्रस्तुत प्रतिनिधीला दिली.