Home Social आदर्श सामुहिक विवाह संम्मेलनामुळे समाजात साधेपणा, एकात्मता आणि सामाजिक बांधिलकी यांचा संदेश...

आदर्श सामुहिक विवाह संम्मेलनामुळे समाजात साधेपणा, एकात्मता आणि सामाजिक बांधिलकी यांचा संदेश अधिक दृढ होत आहेत.:- आमदार रामदास मसराम यांचे प्रतिपादन…

    राकेश चव्हाण 

कूरखेडा तालुका प्रतिनिधी 

        आदिवासी कवर समाज क्षेत्रीय समिती, नान्ही (ता. कुरखेडा) यांच्या वतीने आयोजित आदिवासी कवर समाज आदर्श विवाह संम्मेलन २०२६ आज उत्साहात पार पडले.

         या कार्यक्रमाला आमदार श्री. रामदास मसराम यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले व नवदांपत्यांना आशीर्वाद दिले. आपल्या भाषणात त्यांनी समाजातील एकोपा, परंपरा जपत प्रगत विचार स्वीकारण्याचे महत्त्व अधोरेखित केले.

             या आदर्श विवाह संम्मेलनामुळे समाजात साधेपणा, एकात्मता आणि सामाजिक बांधिलकी यांचा संदेश अधिक दृढ होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

          त्या प्रसंगी उपस्थित गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ.नामदेवजी किरसान साहेब, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष कुरखेडा जिवन पाटील नाट, माजी सभापती गिरीधर तितराम, आदिवासी कवर समाज अध्यक्ष सुनेर सोनटापर, प्रा मेघराज कपूर, संचालक आदिवासी महामंडळ नाशिक भरतसिंग दूधनाग, अशोक फुलकवर, अंबिका बंजार, चंपाबाई सोनकुकरा, अजीत साहळा, कीर्तीबाई चंद्रवंशी,भीकम फुलकवर, धरमदास उईके, गुलाब सोनकुकरा, संतोष साहळा, वामन केवासे, रामविलास केवासे, गणिताताई खोबा, उपस्थीत होते.