उपक्षम रामटेके
मुख्य कार्यकारी संपादक
ज्येष्ठ विचारवंत कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाचे सामूहिक वाचन,त्यावर चर्चा राज्याच्या कानाकोपऱ्यात वंचित बहुजन आघाडी तर्फे करणार असल्याची घोषणा प्रकाश आंबेडकर यांनी काही वेळापूर्वी केली.
आमदार संजय गायकवाड यांनी या पुस्तकावरून प्रकाशकाला आई व बायकोवरून घाणेरडी शिवीगाळ करून घरात घुसून मारहाण करण्याची व पानसरे यांच्याप्रमाणे संपविण्याची धमकी दिल्यानंतर राज्यातील वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर या पुस्तकाचे सामूहिक वाचन व पुस्तकावर चर्चा आयोजित करण्यात येणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.
वंचित बहुजन आघाडीच्या सर्व जिल्हा,तालुका व महानगर समित्यांना अशा कार्यक्रम आयोजित करण्याच्या सूचना प्रकाश आंबेडकर यांनी दिल्या आहेत.
यामागची भूमिका स्पष्ट करताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, “कॉ.गोविंद पानसरे यांनी लिहिलेले ‘शिवाजी कोण होता?’ हे पुस्तक हे ‘कुलवाडी भूषण,बहुजन प्रतिपालक, क्रांतीवीर छत्रपती’ ही शिवाजी महाराजांची खरी प्रतिमा लोकांना समजू नये, असे आरएसएसला वाटते.
आरएसएस छावणीतील हिंदुत्ववाद्यांनी स्वतःच्या सोयीची छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा लोकांसमोर मांडण्याचे षडयंत्र रचले होते,ते षडयंत्र उद्ध्वस्त करण्याचे काम ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाने केले आहे.”



