रामदास ठुसे/शुभम गजभिये
चिमूर…
आमदार कीर्तिकुमार उर्फ बंटी भांगडिया यांच्या पुढाकारातंर्गत काँग्रेस पक्षाचे माजी आमदार डॉ.अविनाश वारजूरकर,चंद्रपूर जिल्हा परिषद माजी अध्यक्ष व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचे महासचिव डॉ.सतीश वारजूरकर,युथ काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश महासचिव व शंकरपूर ग्रामपंचायतीचे सरपंच शाईश सतीश वारजूरकर तसेच पलाश अविनाश वारजूरकर यांनी अधिकृतपणे भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला.
प्रदेशाध्यक्ष श्री.रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते हा पक्षप्रवेश सोहळा मुंबईतील पक्ष कार्यालयात संपन्न झाला.भाजपाचे प्रदेशाध्यक्ष श्री.रवींद्र चव्हाण यांनी पक्ष प्रवेशानंतर वारजूरकर कुटुंबियांचे भारतीय जनता पक्षात मनःपूर्वक स्वागत केले आणि त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
मात्र,वारजूकर बंधूंनी भाजपात प्रवेश करण्याचे खरे गुढ काय? हे अजूनही गुलदस्त्यात आहे.पुढारी स्वत:च्या सोयी नुसार पक्ष बदलवतात.राजकीय,आर्थीक व सामाजिक क्षेत्रात स्वत:ला जैसे थे ठेवण्यासाठी धडपडतात.स्वत:च्या अस्तित्वाला कायम राखण्यासाठी राजकीय गणिते सोडवत राहतात,हे लपून नाही..
माजी आमदार डॉ.अवीनाश वारजूकर,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ.सतीष वारजूकर,सरपंच साईश सतीष वारजूकर,पलाश अवीनाश वारजूकर हे भाजपात कसे फुलतात,हे येणारा काळच ठरवेल…
यावेळी माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी,जिल्हा बँक संचालक आवेश खान पठाण,संचालक गणेश तर्वेकर,विलास ईकार आणि सचिन आकुलवार यांचीही उपस्थिती होती.



