प्रजासत्ताक याचा अर्थ प्रजेची सत्ता,म्हणजे लोकशाही.परंतु ज्या देशातील मतदार विकल्या जातात,म्हणजे पैसे घेऊन मतदान करतात,याचा अर्थ आपल्या मताच्या हक्काची अधिकाराची विक्री करतात,म्हणजेच आपले स्वातंत्र्य विकून त्या बदल्यात गुलामगिरी विकत घेतात म्हणजेच गुलाम होतात.मत विकत घेणाऱ्या मालकाचे गुलाम.अशा प्रकारे प्रजा आपले प्रजासत्ताक विक्री करतात.
निवडून गेलेले लोकप्रतिनिधी आमदार,खासदार आणि ग्रामपंचायत, प. स., जी. प.मेंबर पण स्वतःचे मत विकतात,किंवा एखाद्या पदासाठी आपले मत वरिष्ठ नेत्यास देतात.याचा अर्थ मतदार आणि लोकप्रतिनिधी आपल्या मताचा भ्रष्टाचार करतात.यामुळे प्रजासत्ताक भ्रष्ट होते.कलंकित होते.जिथे सत्ताच विकली जाते,मंत्रीमंडळ फोडल्या जाते,तिथे प्रजेच्या सत्तेचे बारा वाजणारच,यात शंका नाही.
बाबासाहेबांनी बहुजनांना सत्ताधारी जमात बनायला सांगितले,म्हणून sc ,st,obc चे लोक सत्तेत गेले,पण प्रजेला जातीचे धर्माचे पैशाचे दारूचे मटणाचे आमिष दाखूनच,याचा अर्थ भ्रष्टाचाराच्या मार्गाने बहुजनांचे नेते सत्तेत गेले,सत्ता मिळाली पण त्यांना अधिकार मिळाले नाहीत,याचे कारण यांचा ” बोलविता धनी वेगळाच ” म्हणजे मालक वेगळाच असल्यामुळे यांना सत्तेत जाऊनही निर्णय घेण्याचा अधिकार नाही. तो अधिकार भांडवलदार आणि मनुवादी विचारांच्या नेत्याकडे आहे.
पंतप्रधान आणि मुख्यमंत्री हे भांडवलदारांचे आणि मनुवाद्यांचे प्रतिनिधित्व करणारे असल्यामुळे आणि हे लोकप्रतिनिधींना विकत घेत असल्यामुळे हे लोकप्रतिनिधी पण त्यांचे गुलामच आहेत.याचा अर्थ गुलामांची रांग अशी आहे,मतदार हा लोकप्रतिनिधींचा गुलाम आणि लोकप्रतिनिधी हे पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांचे गुलाम,आणि पंतप्रधान आणि मुख्यमंत्री हे भांडवलदार आणि जमीनदारांचे गुलाम.गुलाम म्हणजे विकल्या गेलेली राजकीय माणसे.म्हणजेच लोकशाहीतील सर्वच घटक हे विकल्या गेलेली आहेत म्हणून ते गुलाम आहेत.गुलामीचे हे प्रजासत्ताक,गुलामा चे हे प्रजासत्ताक,विकल्या गेलेले हे प्रजासत्ताक आहे.
ज्या प्रजासत्ताक साठी आपल्या पूर्वजांनी त्याग केला त्यांच्या त्यागाचे फळ म्हणजे हे प्रजासत्ताक होय.परंतु हे अमूल्य फळ हल्ली विकल्या गेलेले आहे.यामुळे आजचे मतदार आणि लोकप्रतिनिधी ( स्वतःला विकून घेणारे ) यांनी प्रजासत्ताकास दर पाच वर्षांनी विकून गुलाम बनत आहेत.
आज प्रजासत्ताकाच्या पूर्वसंध्येला सर्वांना प्रजासत्ताकाच्या हार्दिक तर नाही पण साध्या शुभेछ्या तरी कशा देऊ?


