शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी…
चिमूर :- भिसी मौजा गडपिपरी बिटावरील वनरक्षक भानुदास बोरकर यांची कामाची शैली चांगली असताना अवैध रेती तस्करी धाबे चागले दनादले होते.
तसेच ससा, चितळ, घोरपड, डुकर, मोराची शिकारी बंद झाले.बोरकर यांनी सर्वांना लगाम लावला आहे, गावाच्या लगत घनदाट जंगल आहे.
या जंगल परिसराची देखरेख ठेवण्यासाठी म्हणून वनरक्षक भानुदासजी बोरकर हे कार्यरत आहेत.त्यांच्या कार्यकाळात जंगल परिसरात अगोदर होत असलेले अवैध वृक्षतोड, अवैध चराईवर वनरक्षक बोरकर यांच्या कठोर भूमिकेमुळे प्रतिबंध येऊन जंगलाचे रक्षण होत आहे.
वनरक्षक बोरकर हे 24 तास जंगल परिसरात गस्त घालत असतात, इतकेच नाही तर त्यांच्या कार्यकाळात वनविभागाच्या जागेवर होणारे अतिक्रमणावर प्रतिबंध आलेला आहे. आणि त्यामुळे वनविभागाच्या जागा सुरक्षित आहे. आणि त्यांच्या जंगलाप्रती असलेल्या अशा कठोर भूमिकेमुळे शिकारी करणार्यांना आळा बसले आहे.
जेणेकरून त्यांना अवैध धंदे पुन्हा सुरु करता येईल. परंतु जंगलाचे रक्षण करण्यासाठी अश्या कठोर अधिकाऱ्यांची गरज आहे तेव्हाच जंगले सुरक्षित राहतील.
त्यामुळे वनरक्षक भानुदासजी बोरकर यांची इतर ठिकाणी बदली न करता त्यांना गडपिपरी बिट परिसरातील जंगलाचे रक्षणाकरिता कायम ठेवण्यात यावे अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
बाक्स
गडपिपरी बिटातील वनरक्षक भानुदास बोरकर यांची बदली झाली तर जंगलव्याप्त परिसरामध्ये शिकार करणारे, अवैध धंदे करणारे डोके वर काढतील.
त्यामुळे भानुदास बोरकर हे याच परिसरात वनरक्षक म्हणून राहवे अशी चर्चा परिसरातील नागरीकांमध्ये होत आहे.


