भाजपा कांद्री शाखेच्या वतीने पंडित दीनदयाल उपाध्याय यांची जयंती संपन्न.. — भाजपा तालुका अध्यक्ष योगेश वाडीभस्मे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला कार्यक्रम.

 

    कमलसिंह यादव 

तालुका प्रतिनिधी पारशिवनी 

 

पारशिवनी:-तालुक्यातील काद्री गांव येथे आज सायकांळी योगी लॉन कांन्द्री,पारशिवनी येथे भारतीय जनता पार्टी तालुका व कांद्री शाखेच्या वतीने पंडित दीनदयाल उपाध्याय यांची जयंती तालुका अध्यक्ष श्री योगेश वाडीभस्मे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.

          या प्रसंगी तालुका अध्यक्ष योगेश वाडीभस्मे यानी पंडीत दिनदयाल उपाध्याय यांचे उल्लेखनीय कार्याची माहीती उपस्थित भाजपा कार्यकर्ताना दिली व त्याची प्रेरणा घेऊन आपणास कार्य करण्याची आवश्यकता आहे असे वक्तव केले.

          याप्रसंगी कार्यक्रमाला काद्री शहर भाजपा अध्यक्ष गुरुदेव चकोले,ओबिसी आघाडीचे अध्यक्ष नरेश पोटभरे,माजी ग्रा.पं.सदस्य शिवाजी चकोले,पराग पोटभरे,राजेश यादव, दिनेश खडसे,दिनेश राऊत, आकाश कापसे, संकेत चकोले, संदीप कापसे, उमेश कुंभलकर, राहुल चामट,तनुश्री आकरे, माजी ग्राम पचायत सदस्या विभा राजेश पोटभरे, सुरेंद्र चटप,अभिजीत सावरकर, नितीन नेरले,अशोक कुंभलकर,गणेश किरपान,किरण चकोले,विनोद कोहळे, शुभम कावळे,आकाश सरोदे,अमोल वानखेडे,शुकांशू मेहरकुळे,योगेश रंगारी,चंद्रगुप्त पानतावणे,सचिन वासनिक आदीसह भाजपाच्या विभिन्न आघाडीचे कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.