Home Maharashtra शंकरपुर येथे आधार केंद्रासाठी हाताची दहा बोटे कापुन दान करण्याचा इशारा… ...

शंकरपुर येथे आधार केंद्रासाठी हाताची दहा बोटे कापुन दान करण्याचा इशारा… — चिमूरचे तहसीलदार यांना उपसरपंच अशोक चौधरी यांचे निवेदन…

शुभम गजभिये 

 विशेष प्रतिनिधी…

       चिमूर तालुकांर्गत मौजा शंकरपूर येथे ग्रामपंचायत ला आधार केंद्र सुरु करण्यात यावा अन्यथा सुरु न केल्यास लाभार्थ्यांना घेऊन धरणे आंदोलन करून आपल्या दालनात माझे स्वतःचे हाताचे १० बोटे कापून दान करण्याचा इशारा उपसरपंच अशोक चौधरी यांनी चिमुरचे तहसीलदार राजमाने यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

           तहसीलदार राजमाने यांना निवेदनाद्वारे कळविण्यात आले आहे की, मौजा शंकरपूर येथे ग्रामपंचायत च्या इमारतीमध्ये आधार केंद्र सुरु होते, परंतु हे आधार केंद्र गेल्या माहे नोव्हेंबर २०२३ पासून बंद दिसून येत आहे. सदर केंद्राशी शंकरपूर परिसरातील २८ खेडे जोडलेले असून रोज जवळ पास शेकडो वृद्ध, अपंग, निराधार व लहान मुलास आधार केंद्र सुरू नसल्याने अनेक समस्येचा सामना करावा लागतो. लोक हे आधार केंद्र बंद असल्याने परत जात आहे. त्यांचे कोणतेही काम होत नसल्याने त्यांना आर्थिक भुर्दंड व मानसिक त्रास होत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. 

         शंकरपूर हे गाव १० ते १२ हजार लोकवस्तीचे असून शेकडो लोकांना या सेतू केंद्रात काम पडत असतात परंतु माहे नोव्हेंबर २०२३ पासून हे आधार केंद्र बंद असल्याने जनतेला चिमूर येथे जावे लागत आहे.

        शंकरपुरचे उपसरपंच अशोक चौधरी यांनी तहसीलदार राजमाने यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की गेले अनेक वेळा आपल्या कार्यालयास पत्रव्यवहार करून आपण कोणतीही पत्राची दखल घेतली नाही व कोणतीही चौकशी करून कारवाही केली नाही करिता मी आपणास या पत्राद्वारे सूचित करीत आहो कि येत्या २२ सप्टेंबर २०२५ रोजी पर्यंत आपण योग्य चौकशी करून आधार केंद्र न दिल्यास आपल्या येत्या २ ऑक्टोबर २०२५ रोजी आपल्या कार्यालयात लाभार्थ्यांना घेऊन धरणे आंदोलन करून माझे स्वतःचे हाताचे १० बोटे कापून आपल्या कार्यालयाला दान करण्यात येईल असा इशारा निवेदनातुन देण्यात आला आहे.

          निवेदनाच्या प्रती पालकमंत्री, जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, उपविभागीय पोलिस अधिकारी चिमूर, पोलिस निरीक्षक चिमूर, यांना देण्यात आल्याने प्रशासन काय कार्यवाही करणे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.