ऋग्वेद येवले
उपसंपादक
दखल न्यूज भारत
साकोली :- ‘आझादी का अमृत महोत्सव’ अंतर्गत चालविण्यात येणाऱ्या ‘हर घर तिरंगा २०२५’ या राष्ट्रीय मोहिमेला पाठिंबा देण्यासाठी नवजीवन कॉन्व्हेंट अँड इंग्लिश प्रायमरी स्कूल (सीबीएसई) साकोली येथे रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी देशभक्तीच्या भावनेने ओतप्रोत भरलेल्या, तिरंग्याच्या रंगात सजलेल्या अनेक सुंदर, सुरेख आणि मनमोहक रांगोळ्या काढल्या होत्या.
स्पर्धेच्या निकालाची जबाबदारी परीक्षकांवर होती, ज्यांना प्रत्येक रांगोळीची वैशिष्ट्यपूर्ण सौंदर्यता आणि कलात्मकता पाहून गुण द्यायचे होते. सर्वात उत्कृष्ट रांगोळ्या काढणाऱ्या राजवी वैद्य, दिव्या पाटील, अदिती काशिवार, राणी लांजेवार यांना प्रथम तर अनुश्री चांदेवार, अक्षता शिवणकर, एंजल बनसोड, अवनी गणवीर द्वितीय व तृतीय क्रमांक प्राश्वी बडोले, वैदेही खोटेले, श्रेयांश ढोक आणि वंशिका पुस्तोडे या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण प्राचार्या श्रीमती भारती व्यास, प्रशासकीय अधिकारी श्री. सतिश गोटेफोडे आणि पर्यवेक्षिका श्रीमती वंदना घोडीचोर यांच्या हस्ते समारंभपूर्वक करण्यात आले.
कार्यक्रमाचे यशस्वी संचालन श्री. जयंत खोब्रागडे यांनी केले, तर श्रीमती वैशाली राऊत यांनी सर्वांचा आभार मानला. या समारंभी शाळेचे विद्यार्थी, शिक्षक, शिक्षिका तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.



