Home Social मधुर व गोड आवाजाच्या गायिका रश्मि हिवरे ठरल्या आजपर्यंत अनेक सन्मान पुरस्कारांच्या...

मधुर व गोड आवाजाच्या गायिका रश्मि हिवरे ठरल्या आजपर्यंत अनेक सन्मान पुरस्कारांच्या मानकरी! 

शुभम गजभिये 

 विशेष प्रतिनिधी…

आपल्या मधूर व गोड आवाजाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणाऱ्या चंद्रपूरच्या गायिका रश्मि हिवरे आज पर्यंत अनेक सन्मान पुरस्कारांच्या मानकरी ठरल्या आहेत!अर्थातच त्यांनी अनेक कार्यक्रमातून गाऊन श्रोत्यांची मने जिंकली आहेत.मुळच्या त्या अमरावती जिल्ह्यातील! शालेय व महाविद्यालयीन शिक्षण त्यांचे अमरावती जिल्ह्यात पूर्ण झाल्यानंतर त्या संगित विशारद झाल्या ! गायनाची सुरुवात तशी त्यांची शालेय जिवनापासूनच!

      शाळा व महाविद्यालयातील सांस्कृतिक कार्यक्रमात गायनाची संधी त्यांनी मुळीच सोडली नाही.आज त्यांचं वास्तव चंद्रपूर शहरातील समाधी वार्डात!

      पती पेशाने वकील, कुटुंबातील सदस्यांचे नेहमीच त्यांना गायनासाठी प्रोत्साहन मिळाले आहे.शहराच्या मध्यभागी त्यांचा एक संगित वर्ग!

      याच वर्गात अनेक विद्यार्थी संगिताचे शिक्षण घेत आहेत.हजारों संगित सुगम कार्यक्रमात गायणा-या रश्मि हिवरे ह्या महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलंच्या एक सदस्य!

       त्या आज गायनासोबत विविध न्यूज चैनलच्या निवेदिकांची जबाबदारी पार पाडत आहेत.महाराष्ट्रभर रश्मिचं नांव परिचित आहे.

      मधूर गायनासाठी अनेक सामाजिक संस्था व्दारे त्यांना आज पावेतो बरेच सन्मान पुरस्कार बहाल झाले आहे. नागपूरच्या समाजसेविका व योग शिक्षिका मायाताई कोसरे , अधिवक्ता मेघा धोटे ,साधना धकाते, शैला चिमड्यालवार, रजनी रणदिवे, विजया भांगे, विजया तत्वादी, अधिवक्ता अंजली गुंडावार, संजीवनी धांडे, रंज्जू दिलीप मोडक व नलिनी आडपवार यांच्या सहजं सुचलं व्हाॅट्सअप गृपमुळे मी अधिक प्रसिद्धीच्या झोतात आली अश्या त्या नेहमीच सांगत असतात.