महाराष्ट्र शासन कृषि विभाग,कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन.

संजय टेंभुर्णे

कार्यकारी संपादक

दखल न्यूज भारत 

     यंत्रणा(आत्मा),भंडारा अंतर्गत तालुका कृषी अधिकारी, साकोली कार्यालयामार्फत आज दिनांक 24.5.2023 रोजी ,जिल्हा भंडारा यांच्या वतीने कृषी विज्ञान केंद्र साकोली येथे पर्यावरण पूरक जीवन पद्धती अभियान “हवामान बदल व त्यावर मात करण्यासाठी तंत्रज्ञान” तालुकास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

        सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे श्री अनिल किरणापुरे प स सदस्य व श्री रुपचंद खोटेले प्रगतशील शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष dr dongarwar madam. वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख कृषी विज्ञान केंद्र साकोली, श्री लयंत अनित्य हवामान तज्ञ kvk साकोली हवामान बदल तंत्रज्ञान, दामिनी ॲप या विषयावर मार्गदर्शन केले. तसेच बीजप्रक्रिया व बियाणे निवडी विषयी श्री. उंबरकर कीड शास्त्रज्ञ kvk साकोली यांनी मार्गदर्शन केले. श्री महल्ले यांनी bbf सीड ड्रिल व त्याचे फायदे शेतकऱ्यांना समजावून सांगितले.श्री रुपचंद खोटेले प्रगतशील शेतकरी dharmapuri यांनी त्यांच्या शेतात वापरीत असलेले सगुणा धान पद्धत व धान रोवणी यंत्राचे आपले अनुभव सांगितले.तसेच गटामार्फत शेतकऱ्यांना मशीन द्वारे धान लागवड करून देण्याचे देखील प्रस्तावित केले.

     पर्यावरण जोपासना करिता सेंद्रिय शेती व खत बनविण्याच्या विविध पद्धती तसेच साकोली येथे निवड केलेले 300 हेक्टर वरील परंपरागत कृषी विकास योजना याविषयी सविस्तर माहिती कू. रजनीगंधा टेंभूरकर तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्मा साकोली यांनी दिली.

सदर कार्यशाळेत संरक्षित शेती , पॉलिहाऊस, ठिंबक, तुषार सिंचन, सेंद्रिय शेती, अझोला , बीज प्रक्रिया, बियाणे उगवण क्षमता, बियाणे खरेदी करते वेळेस घ्यावयाची काळजी, भात पीक लागवडीच्या विविध पद्धती,PMFME, पौष्टिक तृणधान्याचे महत्व, पर्यावरण पूरक कृषी विभागाच्या विविध योजना, बीजोत्पादन भात शेती , फळबाग लागवड, BBF लागवड तंत्रज्ञान यावर सखोल मार्गदर्शन करून चर्चा करण्यात आली. 

विविध गटातील व गावातील 45 शेतकरी पुरूष व महिला कार्यक्रमास उपस्थित होते.

    शेवटी सदर कार्यक्रमाला उपस्थित प्रशिक्षणार्थ्यांचे व मार्गदशकांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. मोहन कपगते तज्ञ प्रशिक्षक Pkvy यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार कू. रजनीगंधा टेंभूरकर btm साकोली यांनी मानले.