Home देशविदेश आमचा नॉनबायलॉजीकल EVM प्रधानमंत्री, मागच्या दाराचा विश्वगुरू,युनोचा कायम सदस्य म्हणून सहावा देश...

आमचा नॉनबायलॉजीकल EVM प्रधानमंत्री, मागच्या दाराचा विश्वगुरू,युनोचा कायम सदस्य म्हणून सहावा देश का बनवू शकला नाही?

     “एकतर हे EVM प्रधानमंत्री म्हणून सर्व जगात कुपरिचित आहेत. यांना कांही 2019 पासून नैतिक जनाधार नाही.

          कारण 2014 ते, 2019 च्या पहिल्या पाच वर्षात स्वतःला नॉनबायलॉजील घोषित करून विश्वगुरू बनण्यासाठी अक्षरशः विमानाच्या पायाला भिंगरी बांधून बीन बुलाए मेहमान होऊन जगभर फिरले. त्यासाठी नाईलाजास्तव अमेरिकेने गोध्राहत्याकांडाचा ठपका ठेऊन याच स्वयंघोषित विश्वगुरूला दहा वर्षासाठीची असलेली अमेरिकेची प्रवेशबंदी उठवली.

         यालाच आपण अमेरिकेला झुकवलं म्हणून स्वतःचं 56 इंची छाती फुगवत जगाला सांगत सुटले. जेंव्हा पहेलगाम हत्याकांडानंतर आमच्या जिगरबाज संरक्षण दलाने” सिंदूर ऑपेरेशन ” केले. मात्र, सीझफायरची घोषणा डोनाल्ड ट्रम्पने केली तेंव्हा 56 इंचातली हवा भ्रष्ट होऊन 34 इंचावर आली!

        जगातल्या तिसऱ्या किंवा पाचव्या अर्थ महासत्तेची घोषणा हवेतच विरली. 

         अदानी / अंबानी जोडगोळीला सोबत घेऊन अमित शहाच्या दादागिरीच्या मदतीने दोन कुबड्या घेऊन त्यांना सांभाळण्यातच भारताचा नेपाळ आणि बांगलादेश तसेच श्रीलंका व पाकिस्तान होऊ नये या भीतीपोटी या कुबड्यावर आणि आमदार / खासदार खरेदीसाठी देशाची तिजोरी आणि RSS ची RBI रिकामी करण्याची तयारी ठेवली. जेणेकरून स्वयंघोषित नॉनबायलॉजिकल /विश्वगुरूला स्टॅलिन,हिटलर,मुसोलिनी आणि किम जोंग यांच्या रांगेत 2029 पर्यंत जाऊन बसण्याच्या हौसेपोटी हा सर्व खटाटोप देशात चालू आहे.गुडघ्याला बाशिंग बांधून बोहल्यावर चढण्याच्या 2029 च्या तयारीत आहे!

         पण हा हे विसरतो की,या देशातच नव्हे तर संपूर्ण विश्वात निसर्गनियमावर आधारित असलेल्या स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता या संविधानिक आणि लोकशाही मुल्यावर आधारित असलेल्या भारताच्या संविधानाच्या शिल्पकाराचे…

     “आक्रमक आंबेडकरवादी लेकरं “अजूनही जिवंत आहेत!

       ते जरी विखूरलेले वरून वरून दिसत असले तरी,त्यांचे अंतिम ध्येय तेच आहे.

       “असतील जरी आमुचे मतभेद आपसाचे,जयभिमच्या नावावर करू बलिदान जीवाचे.”

          या EVM म्हणजेच मनुस्मृतीला हटविण्यासाठी पुन्हा एकदा 2029 पर्यंत ” भीमा कोरेगाव ” करायलाही मागेपुढे पाहणार नाहीत.

         हाच खरा आंबेडकरवाद आणि खरी संविधान जागृती आहे.आणि आक्रमक आंबेडकरवादीच खरा संविधानवादी आहे.कारण तो बुद्धाची शांती जपतो म्हणून शांत आहे.

        जबतक बातोंसे काम होता है,तो ठीक है,अगर ये बात समझमे नही आती,तो फीर लातोसे ही काम करना पडेगा. 

           आवाहनकर्ता 

           अनंत केरबाजी भवरे

संविधान विश्लेषक, रेणापूरकर, औरंगाबाद, 7875452689..