सायकल स्वाराचा कालव्याच्या पाण्यात बुडून मृत्यू..

    कमलसिंह यादव

तालुका प्रतिनिधी पारशिवनी..

           साई सेलिब्रेशन हॉल ते खापरखेडा मार्गातंर्गत कालव्याचे रस्त्याने सायकलने निघालेला सायकल स्वार सायकल सहित कालव्यात पडला.कालव्यात पाणी असल्यामुळे तो पाण्यात बुडून मरण पावला असल्याची धक्कादायक घटना घडली.

          पारशिवनी येथील पेंच लघु कालव्यात २४ डिसेंबरला म्हणजे आजच दुपारी १-३० वाजताच्या दरम्यान सायकल स्लीप झाल्यामुळे सायकलस्वार पेंच लघु कालव्यात पडला व सदर इसमाचा मृत्यू झाला असल्याची दुःखद् घटना घडली.

             ज्ञहिरामण वरखडे वय ४५ वर्षे रा.वार्ड क्रमांक ३ ,बोरबन पारशिवनी असे मृतकाचे नाव आहे.मिळालेल्या माहितीनुसार घटनेच्या वेळी मृतक हिरामण हा काही कामा निमित्ताने घरुन बाजारात आला होता व घटनावेळी साई सेलिब्रेशन हॉल ते खापरखेडा रस्त्याने सायकलने निघाला.

           पण सदर रस्ता हा कच्चा व खड्डामय असल्यामुळे मृतकाचा सायकल स्लिपमुळे तोल बिघडला व मृतक हा सायकल सहित कालव्यात पडला.कालव्यात पाणी असल्यामुळे तो पाण्यात बुडून मरण पावला.

             ही घटना आजूबाजूच्या लोकांना लक्षात येताच घटनेची माहिती पारशिवनी पोलिसांना देण्यात आली. 

             माहितीवरून पोलीस घटनास्थळी दाखल झाले व बुडालेला देह बाहेर काढून उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय पारशिवणी येथे दाखल केले.वैद्यकीय तपासणी अंती सदर व्यक्तीला मृत घोषित केले.यानंतर मृत्यूदेहाचा शवविच्छेदन होणार आहे.पुढील तपास पारशिवनी पोलीस करीत आहे.