तो अपघात वेदनातंर्गत दुःख देऊन गेला..

दिक्षा ललिता देवानंद कऱ्हाडे

              वृत्त संपादीका 

        शेगाववरून नातेवाईकांच्या अंत्यसंस्कारासाठी नागभीड तालुक्यातील सारंगड येथे टाटा सुमोने जात असताना चिमूर-नेरी मार्गावरील उमरे यांच्या पोल्ट्रीफॉर्मजवळ वाहनाचे रॉड तुटल्याने अपघात झाला होता.

         गाडीचा राॅड तुटल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले व वाहन रस्त्याच्या कडेला उलटून सरळ शेतात घुसले होते.

           या अपघातात एकाचा मृत्यू झाला तर दहा जण जखमी झाले आहे.एम.एच.२६,एल. १६३७ या क्रमांकाच्या वाहनाने १२ जण नातेवाईकाच्या अंत्यसंस्कारासाठी जात असताना शुक्रवारी दुपारी १२ ते १ वाजताच्यादरम्यान हा अपघात झाला. 

         यात नानाजी शिवराम जीवतोडे (६५) यांचा उपचारासाठी नागपूरला नेत असताना वाटेत मृत्यू झाला.तर वाहनातील चालक गजानन मारोती बावणे (३४) याच्यासह विद्या राकेश जीवतोडे (२५), रंजना विलास जीवतोडे (४०), शोभा मधुक जीवतोडे (६०), शिला शंक जीवतोडे (६५), नागुबाई विनायव् जीवतोडे (५०), माधुरी विनायक जीवतोडे (१८), विनायक नामदेब जीवतोडे (६०), गिरजा गुलाट जीवतोडे (६०) व समीक्षा देविदास दडमल (२८) आदी जखमी झाले होते.

        गंभीर जखमी नानाजी शिवरा जीवतोडे यांना नागपूरला हलवितान वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.