Home जिल्हा ट्रक बॅटरी चोरी प्रकरणाचा रामनगर पोलिसांनी केला पर्दाफाश,₹.98 हजारांचा मुद्देमाल जप्त..‌  ...

ट्रक बॅटरी चोरी प्रकरणाचा रामनगर पोलिसांनी केला पर्दाफाश,₹.98 हजारांचा मुद्देमाल जप्त..‌  — रामनगर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी – ट्रक बॅटरी चोरी प्रकरणातील दोन्ही चोरट्यांना अटक..

   अमान कुरेशी

जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर 

    दखल न्यूज भारत..

    चंद्रपूर एसपी,एएसपी आणि एसडीपीओ यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकानी उत्कृष्ट कामगिरी केली असल्याचे बॅटरी चोरी प्रकरणावरुन पुढे आले आहे.

       फिर्यादी करण अर्जुन झामरे (वय 23, रा. कोसारा, चंद्रपूर) यांनी दिनांक 23/11/2025 रोजी पोलीस स्टेशन रामनगर येथे दिलेल्या तक्रारीनुसार,त्यांचा ट्रक क्र. MH 34 M 8674 तसेच दुसरा ट्रक क्र.MH 34 AB 3859 यांच्या कॅबिन उघड्या अवस्थेत आढळून आल्या.

        तपासल्यावर ट्रकमधील १०,००० रुपयांचा मुद्देमाल —

 जुनी लाल बॅटरी (₹4,000)

 हायड्रोलीक जॅक (₹2,000)

 इनोव्हा कंपनीची बॅटरी (₹4,000) असा सर्व माल चोरीस गेल्याचे दिसून आले.

       फिर्यादीच्या तक्रारीवरून चोरीचा गुन्हा नोंदवून तपास सुरू करण्यात आला

       गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आशिफ राजा शेख यांच्या नेतृत्वात विशेष पथक तयार करण्यात आले.गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी सप्रेम लेमचंद दुर्गे (वय 19, रा. MIDC हनुमाननगर),अख्तर गुलाम हुसेन (वय 20, रा. म्हाडा कॉलनी दाताळा) यांना नाईट गस्तीदरम्यान दाताळा रोडवर संशयित अवस्थेत पकडण्यात आले.चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

       INNOVA INB-100Z बॅटरी – ₹.4,000,AXON लाल बॅटरी – ₹.4,000,AXON लाल-पांढरी बॅटरी – ₹.4,000,EXIDE XPRESS बॅटरी – ₹.4,000,PRYCAL PN90 बॅटरी – ₹.4,000,हिरो स्प्लेंडर प्लस मोटारसायकल (MH 34 CG 6110) – ₹.70,000

तीन हायड्रोलीक जॅक – ₹.6,000,साधा जॅक – ₹.2,000,अशा एकूण जप्त माल ₹.98 हजार रुपयांचा जप्त करण्यात आला…

      या यशस्वी कारवाईत खालील अधिकारी व कर्मचारी सहभागी होते…

         श्री.मुम्मका सुदर्शन – पोलीस अधीक्षक चंद्रपूर,श्री.ईश्वर कातकडे – अपर पोलीस अधीक्षक,श्री.प्रमोद चौगुले – उपविभागीय पोलीस अधिकारी,श्री.आशिफ राजा शेख – वरिष्ठ पोलीस निरीक्षक,स.पो.नी.देवाजी नरोटे,हनुमान उगले,निलेश वाघमारे व इतर सर्व कर्मचारी..