Home Social खासदार डॉ.प्रशांत पडोळे यांच्या जन्मदिनी फळवितरण… — साकोली उपजिल्हा रुग्णालयात शहर...

खासदार डॉ.प्रशांत पडोळे यांच्या जन्मदिनी फळवितरण… — साकोली उपजिल्हा रुग्णालयात शहर काँग्रेसचे आयोजन…

निलय झोडे

  उपसंपादक 

दखल न्यूज भारत 

साकोली : भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांच्या वाढदिवसानिमित्त ( बुध. २४ सप्टें.) ला उपजिल्हा रुग्णालय साकोली येथे शहर काँग्रेस कमिटीवतीने रूग्णांना फळवितरण करण्यात आले. प्रसंगी सर्व तालुका आणि शहर काँग्रेस, महिला कॉंग्रेस, युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 

          खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांच्या वाढदिवसानिमित्त साकोली पंचायत समिती उपसभापती करूणा वालोदे यांच्या हस्ते उपजिल्हा रुग्णालयात फळवितरण करण्यात आले. याप्रसंगी ता. कॉंग्रेस अध्यक्ष डॉ. अशोक कापगते, शहर अध्यक्ष दिलीप मासूरकर, महिला कॉंग्रेस शहराध्यक्षा पुष्पा कापगते, सुचिता आगाशे, माधुरी रासेकर, रूपलता वलथरे, प्रेमलता सुर्यवंशी, दिलीप निनावे, ताराचंद बडवाईक, ग्यानीराम गोबाडे, भास्कर खेडीकर, सचिन राऊत, पराग कोटांगले, सतिश रंगारी, पगाजी शेंदरे, माधव गहाणे, प्रमोद मडावी, रामेश्वर झोडे, सांसद यांचे स्वीय सहाय्यक मेदन लांडगे, लिनप्रकाश राऊत, दर्यावर डोंगरे, कुलदिप नंदेश्वर, कृष्णा हुकरे, संजय राव आणि सर्व कॉंग्रेस पक्षातील विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 

         उपजिल्हा रुग्णालयात याप्रसंगी वैद्यकीय अधिक्षक डॉ.भास्कर गायधने, वैद्यकीय अधिकारी डॉ. डी. टी. चंदवानी, डॉ. आशिष चिंधलवार, डॉ. शिवानी हारोडे, डॉ. सौरभ मुंगमोडे व डॉ. वैष्णवी खराबे यांनी दोन्ही रूग्ण वार्डात सर्वांचे स्वागत करून प्रत्येक रूग्णांची ओळख करून देण्यासाठी सहकार्य केले.