निलय झोडे
उपसंपादक
दखल न्यूज भारत
साकोली : जागतिक फॉर्मसिस्ट दिवस (२५ सप्टेंबर ) निमित्ताने उद्या गुरुवारी २५ सप्टेंबर शहरात साकोली मेडीकल असोसिएशन कडून “फॉर्मसिस्ट” रॅली व एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन बाजीराव करंजेकर फॉर्मसी व इंजिनिअरींग कॉलेज येथे आयोजित केले आहे.
जागतिक फॉर्मसिस्ट दिवस निमित्ताने उद्या स. ८:३० ला वैनगंगा शिक्षण महाविद्यालय प्रांगणातून “फॉर्मसिस्ट रॅली” ला तहसिलदार निलेश कदम व डॉ. सोमदत्त करंजेकर हे हिरवी झेंडी दाखवून रवाना करतील. ही रॅली मुख्य शहर गणेश वार्ड लाखांदूर रोड गोवर्धन चौक ते परत वैनगंगा कॉलेज येथे समापन होईल. कॉलेज सभागृहात १०:३० ला रक्तदान शिबीर, ११:३० ला सेवानिवृत्त औषधी विक्रेत्यांचा सत्कार व जागतिक फॉर्मसिस्ट दिवस निमित्ताने एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले आहे.
यात प्राचार्य आतिश शहारे, प्रा. चंद्रशेखर चकोले, प्रा. भोजराम सातपुते व अन्य वक्ता मार्गदर्शन करतील. या सर्व कार्यक्रमांस उपस्थित रहावे असे आवाहन वैनगंगा बहुउद्देशीय शिक्षण विकास संस्थेतील कर्मचारी व मेडीकल असोसिएशनचे हिरालाल पारधीकर यांनी केले आहे.



