भाविकदास करमनकर
तालुका प्रतिनिधी धानोरा
आपल्याला यशस्वी जीवन जगायचे असेल तर आपण आपणास येत असलेल्या कौशल्यांमध्ये निपुण असले पाहिजे आणि कौशल्य आत्मसात करण्यासाठी परिश्रमाची तयारी असली पाहिजे असे मत तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दहिफळे यांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या नामांतर समारंभ प्रसंगी अध्यक्ष स्थानावरून व्यक्त केले.
धानोरा येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे टिपागड गुरुबाबा औद्योगिक प्रशिक्षण संस्था असे नामांतरण प्रसंगी संस्थेचे प्राचार्य लोणे प्रमुख अतिथी म्हणून माजी पंचायत समिती सदस्य चंदू किरंगे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक लालाजी उसेंडी, सिताराम बडोदे,मुस्ताक कुरेशी, विनोद नवले, करमरकर, गणेशजी कंटीवार,मडावी रामटेके तथा शिल्पनिदेशक उपस्थित होते.
पाहुण्यांच्या स्वागतासाठी पारंपारिक गोंडी नृत्य सादर केले सदर प्रसंगी नामांतर फलकाचे मान्यवरांचे हस्ते अनावरण करण्यात आले. पुढे बोलताना डॉ. दहिफळे यांनी सदर संस्थेचा नावलौकिक विद्यार्थ्यांनी करण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन केले.
सदर प्रसंगी चंदूजी किरंगे लालाजी उसेंडी सिताराम बडोदे आणि मान्यवरांनी समायोजित मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाचे संचालन शुभम देशपांडे यांनी तर आभार प्रदर्शन मोहुर्ले सर यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वी तिच्यासाठी सह प्राचार्य मधु पवार,रामटेके,याट्टेवार, गोगले,भंडाराखे, बुंदेले,पिंटू उसेंडी, आशिष माशाखेत्री,दाशा कुमरे आदींनी परिश्रम घेतले.



