Home Social मिनी डोअरची झाडाला धडक,दहा जखमी,चार गंभीर… — आमदारांनी रुग्णालयात घेतली जखमींची...

मिनी डोअरची झाडाला धडक,दहा जखमी,चार गंभीर… — आमदारांनी रुग्णालयात घेतली जखमींची भेट,योग्य उपचारांबाबत केली डॉक्टरांसी चर्चा…

भाविकदास करमनकर

तालुका प्रतिनिधी धानोरा..

          तालुक्यातील येरंडी येथून लेखा येथे नातेवाईकाचे घरी बारशाचे कार्यक्रमाला जात असताना मिनी डोअरची झाडाला धडक लागल्याने दहाजन जखमी झाल्याची घटना 23 जानेवारी रोजी दुपारी तीन वाजता राजोली-धानोरा मार्गावर घडली.

        यापैकी चार गंभीर आहेत.लेखा येतील रामा हलामी यांच्या नातवाच्या बारशाचा कार्यक्रम असल्याने या कार्यक्रमाला येरंडी इथून मिनी डोअरने जात असताना राजोली धानोरा मार्गावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी अनियंत्रित होऊन रोडचे खाली उतरून झाडाला धडक दिली.

               या धडकेत चालक प्रफुल पदा एरंडी वय 27, लालाजी गावडे वय 50 नवरगाव,मोतीराम उसेंडी वय 50 एरंडी,गणू गावडे वय ७० एरंडी,मोतीबाई नरोटे वय 60 एरंडी, वच्छला कुमोटी एरंडी वय 50,अनिता पदा एरंडी वय 40,इंदू कुमोटी एरंडी वय 60,जाईबाई उसेंडी एरंडी वय 70,विश्वनाथ पदा एरंडी वय 61,हे जखमी झाले.

          त्यांना धानोरा ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. तेथे उपचार करून यापैकी चार गंभीर जखमीना गडचिरोली येथे रेफर करण्यात आले.धानोरा ते गडचिरोली मुख्य मार्गापासून राजोली गावाकडे जाणाऱ्या रस्त्याचे नवीनच सिमेंट बांधकाम करण्यात आले आहे.

            त्या रस्त्यावर पोते अंथरून पाणी टाकण्यात येत आहे.त्यामुळे गाडी स्लीप होऊन चालकाचे नियंत्रण सुटले.रस्त्याचे कडा भरलेल्या नसल्यामुळे गाडी अनियंत्रित होऊन झाडाला धडक बसली.

           आमदार डॉक्टर मिलिंद नरोटे यांनी ग्रामीण रुग्णालयात येऊन जखमींची विचारपूस केली व योग्य उपचार करण्याची डाॅक्टरांना सूचना केली.