शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी…
राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची आढावा बैठक आज,”आधार बंगला पिंपळनेरी रोड चिमूर येथे संपन्न झाली.या बैठकीत विविध विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली.
चिमूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ विजय गावंडे पाटील यांनी चिमूर विधानसभेचे निरीक्षक संजय दुबे यांचे निर्देशानुसार आढावा बैठक बोलावण्यात आली होती.

या बैठकीत संघटनात्मक,ओला दुष्काळ व जिल्हा परिषद,पंचायत समिती,नगरपरिषद,नगरपंचायत निवडणुकीच्या संदर्भात निरिक्षक संजय दुबे यांनी बैठकीत आढावा घेतला.आढावा बैठकीला तालुक्यातील असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
या बैठकीला चिमूर विधानसभा निरिक्षक संजय दुबे प्रत्यक्ष हजर होते.त्यांनी आढावा बैठकीला संबोधित करताना मी कोणत्याही नेत्याच्या दबावात येऊन काम करणार नाही अशी ग्वाही दिली.

येणाऱ्या पंचायत समिती,जिल्हा परिषद निवडणुकीत ग्रामीण भागात फिरून कार्यकर्त्यांशी चर्चा करणार व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये उमेदवारांची निवड करून काँग्रेसला यश मिळवून देऊ अशी हमी त्यांनी दिली.याचबरोबर त्यांनी आज चिमूर येथे येऊन कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण केला.
चिमूर तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा आणि विविध मागण्यांसह लवकरच धरणे आंदोलन कार्यक्रम घोषित होणार आहे.
राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या आज झालेल्या आढावा बैठकीला उपस्थित पक्ष श्रेष्ठींनी मार्गदर्शन केले.तद्वतच आढावा बैठकीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपापल्या भावना व्यक्त केल्यात.
यावेळी चिमूर विधानसभेचे माजी आमदार डॉ.अविनाश भाऊ वारजूकर,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस डॉ.सतीश वारजुकर,महाराष्ट्र सेवा दलाचे सहसचिव प्रा.राम राऊत,काँग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष किशोर बापू शिंगरे,घनश्याम चाफले सेवादल सदस्य तथा नेरी कार्याध्यक्ष,किसान सेलचे अध्यक्ष राजू कापसे,अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष आरिफ शेख,अनुसूचित जातीचे अध्यक्ष लोकनाथ रामटेके,महिला काँग्रेसच्या महिला पदाधिकारी सविता चौधरी,माधुरी रेवतकर,शहर महिला अध्यक्ष राणी थुटे,माजी पंचायत समिती सदस्य भावनाताई बावनकर,माजी नगरसेविका कल्पना इंदूरकर,भावना पिसे नेरी महिला अध्यक्ष,सुरेखा शेबेकर,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे ओबीसी सेलचे धनराजजी मुंगले,चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस गजानन बुटके,काँग्रेसचे ज्येष्ठ मार्गदर्शक कादरबाबू,जिल्हा काँग्रेस व चिमूर तालुका काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष माधवबापू बिरजे,जिल्हा काँग्रेस कमिटीचे धनराज मालके,जिल्हा काँग्रेसचे महासचिव सचिन गाडीवार,चिमूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष अविनाश अगडे,पप्पू शेख,तालुका काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष विवेक कापसे,मधुभाऊ मुंगले,विलास पिसे नेरी-नवतळा चे सर्कल प्रमुख,ललित डुकरे,युवक काँग्रेसचे अध्यक्ष नागेंद्रजी चट्टे,प्रशांत डवले,तालुका काँग्रेसचे पदाधिकारी राजू चौधरी,माजी नगरसेवक विनोद ढाकूनकर,भिसी नगर काँग्रेसचे अध्यक्ष विजय मेहर,शंकरपूर नगर काँग्रेसचे अध्यक्ष गोकुळ सावरकर,मासळ मदनापूर सर्कलचे सुभाष बन्सोड,डॉ. रहमान पठाण,माजी उपसभापती शांताराम बापू सेलवटकर,माजी पंचायत समिती उपसभापती स्वप्निल मालके,एन एस यु आय चे श्रीकांत गेडाम,व असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते आढावा बैठकीला उपस्थित होते.



