Home Social कॉ.विनोद झोडगे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन संपन्न… 

कॉ.विनोद झोडगे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन संपन्न… 

ऋषी सहारे 

   संपादक

ब्रम्हपुरी :- देशातील शोषित ,वंचित असंघटित, कामगार, मजदुर यांच्या हक्कासाठि, न्यायासाठी जमिनीवर उतरून कार्य करणारे सर्व समावेशक पार्टी भारतीय कम्युनिस्ट पार्टी. निरंतर लोकांचे हित जोपासणारी चळवळ व चळवळीतील कार्यकर्ते डोळ्यात अंजन टाकून काम करीत असतात.

        भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे अनेक चळवळीचे कार्यकर्ते निर्माण करण्याची किमया ब्रह्मपुरी तालुक्यात कॉ.विनोद झोडगे पाटील यांनी केली. व पार्टीचे अनेक पदे भूषविली.ब्रम्हपुरी हे तालुक्याचे मुख्यालय आहे तहसील कार्यालय,पंचायत समिती व अन्य शासकीय कार्यालय आहेत त्यामुळे ब्रम्हपुरी पासून 40 ते 50 की.मी. अंतरावरील गावकऱ्यांना आपल्या समस्या घेऊन न्याय मागण्यासाठी धाव घ्यावी लागते.ही अडचण लक्षात घेता. तद्वतच ग्रामीण भागातील शेतकरी ,कष्टकरी मजूर,महिला त्याच बरोबर असंघटित कामगार यांच्या समस्येचे निराकरण व्हावे म्हणून भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे जिल्हा सहसचिव तथा राज्य कौन्सिल सदक्ष कॉ.विनोद झोडगे पाटील यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन सोहळा गांगलवाडी येथे पार पडला.

         या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव मंडळ सदक्ष कॉ.डॉ.महेश कोपुलवार, डॉ.भूषण भोयर,माजी जिल्हा परिषद सदस्य दादा सातपुते यांच्या हस्ते करण्यात आले.

         विशेष म्हणजे या उद्घाटन सोहळ्या करिता विविध सामाजिक संघटना, पक्षाचे मान्यवर ज्यामध्ये संजय भोयर ग्राम पंचायत सदक्ष, मनोहर भरे उपसरपंच,प्रशांत डांगे, पद्माकर रामटेके खोरीप, ईश्वर ठाकरे माजी सरपंच,विनोद पाटील,महेश पानसे,संजय वाकडे,प्रकाश खोब्रागडे, चुनीलाल मोटघरे,धनराज ठाकरे,सुधाकर ठाकरे,मालवी सर, विक्की उरकुडे,प्रदीप नखाते यासह आदी उपस्थित होते.