राकेश चव्हाण
कूरखेडा तालुका प्रतिनिधी
कुरखेडा वनआगारात मागील दोन तीन वर्षां पासून अंत्य विधी करिता जळाऊ लाकूड बीट हे तीन ते साडे तीन हजारात विकत घ्यावे लागत आहे त्यामुळे सर्वसामान्य तसेच गरीब कूटूंबियाना मरणाचा दूखातही वेळेवर पैशाची जूळवाजूळव करण्याकरीता तारेवरची कसरत करावी लागते.
तसेच वन आगारात बुरुड कामगार करिता हिरवे बांबू सुद्धा उपलब्ध नाही बांबू उपलब्ध नसल्याने परंपरागत बांबू कामगारांचा रोजगार हिरावला जात आहे त्यांचा पारंपारिक कला व व्यवसायाचा संवर्धनाकरीता जिल्हातील सर्व वन आगारात बूरड समाजाला आवश्यक प्रमाणात माफक दरात बांबू उपलब्ध करून द्यावे.
कूरखेडा आगारात सर्वसामान्याना अंत्यविधी करीता मोफत लाकूड बिट उपलब्ध करून देण्यात यावे. या मागणीचे निवेदन आज गूरूवार रोजी शिंदेसेनेचा वतीने गडचिरोली येथे सह पालक मंत्री ॲड आशिष जी जयस्वाल यांना देण्यात आले.
याप्रसंगी शिवसेना लोकसभा संघटक सुरेन्द्र सिंह चंदेल यांच्या नेतृत्वात शिवसैनिकाकडून निवेदन देण्यात आले. यावेळी निवेदनाची तातडीने दखल घेत मंत्री आशिष जयस्वाल यांनी वनसंरक्षक गडचिरोली यांना आवश्यक कार्यवाही करण्याची सूचना केली.
याप्रसंगी शिवसेना महिला आघाडी जिल्हा संपर्क प्रमुख वर्षा मोरे, सह संपर्क प्रमुख हेमंत जबेवार ,जिल्हा प्रमुख राकेश बेलसरे , जिल्हा प्रमुख आरमोरी विधानसभा संदीप ठाकूर, लोमेश हरडे, नवनाथ उके उपस्थित होते.



