Home Maharashtra परतवाडा अश्लील व्हिडीओ प्रकारणातील आरोपीना कठोर शिक्षा देण्यात यावी… — वंचित...

परतवाडा अश्लील व्हिडीओ प्रकारणातील आरोपीना कठोर शिक्षा देण्यात यावी… — वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा पोलीस अधिक्षकांना निवेदन… — शिक्षा न झाल्यास आंदोलनाचा दिला इशारा… 

युवराज डोंगरे 

   उपसंपादक 

खल्लार :- परतवाडा येथिल व्हिडिओ कांड प्रकरणामुळे जिल्ह्यात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून या प्रकरणातील दोषींवर तात्काळ कठोर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे.

         या प्रकरणात अमरावती जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक विशाल आनंद यांनी अत्यंत बारकाईने या प्रकरणाचा स्वतः तपास करून यामध्ये आरोपींना तात्काळ अटक केली करुन तत्परता सिद्ध केली आहे.

        दोषीना शिक्षा न झाल्यास रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी अयान व त्याच्या सहकाऱ्यांनी महिलां सोबत केलेले कृत्य अत्यंत लज्जास्पद व संताप जनक आहे.

         या घटनेमुळे समाजात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. सदर प्रकरणाकडे हिंदू मुस्लिम दृष्टिकोनातून पाहण्याऐवजी जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर भेदभाव न करता कडक शिक्षा झाली पाहिजे तसेच पीडीतांना तात्काळ पोलीस संरक्षण देण्यात यावे अशीही मागणी ही करण्यात आली.

          काही राजकीय पक्ष या प्रकरणावरून राजकारण करत असून त्यामुळे सामाजिक सलोखा बिघडण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन कायदा सुव्यवस्था कायम राखावी तसेच समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवरही कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

            निवेदन देताना वंचित बहुजन आघाडीचे पूर्व जिल्हाप्रमुख राहुल मेश्राम पश्चिम जिल्हाप्रमुख संजय चौरपगार, भारतीय बौद्ध महासभेचे राज्य संघटक विजयकुमार चौरपागार, जिल्हा उपाध्यक्ष आनंदराव इंगळे, महानगर सचिव रमेश आठवले, ऍड.सुनिल गजभिये, नंदकुमार खंडारे, शैलेश बागडे,करण जाधव, माजी शहराध्यक्ष बाबाराव गायकवाड, प्रशांत गजभिये,अमोल जवंजाळ,विशाल तायडे इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.