लक्षवेधी
शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी
चिमूर तालुक्यातील रस्ता बांधकामाच्या प्रकरणावरून प्रशासनाचा अत्यंत गलथान कारभार समोर आला आहे.जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणामुळे आणि चुकीच्या नियोजनामुळे ५० शेतकऱ्यांचे अस्तित्व धोक्यात आले असून,या अन्यायाविरोधात येत्या १ मे रोजी महाराष्ट्र दिनी जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर येथे सामूहिक विष प्राशन करण्याचा इशारा माकोना येथील शेतकरी व प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते जगदीश मेश्राम यांनी दिला आहे.
पॉईंट…
१) जिल्हा परिषद बांधकाम विभागाचा निष्काळजीपणा…
रस्त्याचे बांधकाम सुरू करण्यापूर्वी त्याचे ‘सीमांकन’ (मोजणी) करणे अत्यंत आवश्यक होते.यासाठी शेतकऱ्यांनी जिल्हा परिषद बांधकाम विभाग चिमूर यांना अनेकदा लेखी व तोंडी कळवले होते.
मात्र,येथील अधिकाऱ्यांनी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले.याचा परिणाम असा झाला की,रस्ता चक्क एका शेतकऱ्याच्या खासगी शेतात बांधला गेला.अधिकृत मोजणी झाल्यानंतर हा धक्कादायक प्रकार सिद्ध झाला असून,या सर्व गोंधळाला केवळ जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे अधिकारीच जबाबदार असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
२) विभागाची टोलवाटोलवी आणि कंत्राटदाराची अडचण,आता हे प्रकरण अंगलट आल्याचे पाहून सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD), चिमूर या रस्त्यावर पुढील काम करण्यास तयार नसल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे.विभाग आपली जबाबदारी झटकत असल्याने कामाचा पेच अधिकच वाढला आहे.
दुसरीकडे,संबंधित कंत्राटदाराला कामाची रक्कम न मिळाल्याने तो देखील त्रस्त झाला असून काम बंद पडले आहे.प्रशासकीय वादात कंत्राटदार आणि विभागाच्या वादाचा फटका मात्र गरीब शेतकऱ्यांना सोसावा लागत आहे.
जगदीश मेश्राम यांचा इशारा….
१ मे ला विष प्राशन करणार या गंभीर विषयावर बोलताना सामाजिक कार्यकर्ते जगदीश मेश्राम म्हणाले की, “प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या अहंकारामुळे आणि चुकीच्या निर्णयामुळे शेतकरी उद्ध्वस्त होत आहे.
रस्ता नसल्याने शेती करणे अशक्य झाले आहे.वारंवार विनंत्या करूनही जर प्रशासन जागे होत नसेल,तर १ मे रोजी ५० शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयावर विष प्राशन करून आपले जीवन संपवतील.



