उपक्षम रामटेके
मुख्य कार्यकारी संपादक
पुरोगामी महाराष्ट्रात धर्माच्या नावाखाली महिलांचे शोषण करणाऱ्या अशोक खरातसारख्या भोंदू बाबांना अभय मिळणे,ही अत्यंत शरमेची बाब आहे असा प्रश्न विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत उपस्थित केला.
त्यांनी विधानसभेत माहिती देताना सांगितले की,ज्योतिषशास्त्राच्या नावाखाली लोकांची दिशाभूल करणाऱ्या या भोंदूचे १०० हून अधिक आक्षेपार्ह व्हिडिओ समोर आले आहेत.या विकृत प्रवृत्तीमुळे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि सामाजिक परंपरेला तडा जात असून,हे खपवून घेतले जाणार नाही.
सर्वात धक्कादायक म्हणजे या भोंदू बाबाला अटक होऊ नये म्हणून शासनाचे उच्चपदस्थ IAS,IPS आणि महसूल अधिकारी एका हॉटेलमध्ये बैठका घेत होते.
जे अधिकारी आणि मंत्री संविधानाची शपथ घेतात,तेच जर अशा भोंदूंच्या पाया पडत असतील,तर सामान्य जनतेने न्याय कोणाकडे मागायचा? केवळ SIT नेमून हे प्रकरण शांत होणार नाही,यात सामील असलेल्या प्रत्येक मंत्र्याचा राजीनामा आणि दोषी अधिकाऱ्यांचे निलंबन झालेच पाहिजे.
या प्रकरणाची व्याप्ती मोठी असून अनेक महिलांची फसवणूक झाली आहे.त्यामुळे ज्या मंत्र्यांनी आणि संवैधानिक पदावर बसलेल्या व्यक्तींनी या भोंदूला प्रतिष्ठा मिळवून दिली,त्या सर्वांचे CDR तपासा आणि त्यांना या गुन्ह्यात सहआरोपी करा अशी मागणी स्थगनच्या माध्यमातून विजयभाऊ वडेट्टीवार यांनी विधानसभेत केली!



