दिक्षा कऱ्हाडे
वृत्त संपादीका
वामनराव पाटील स्मृती प्रतिष्ठान द्वारा आयोजित चक्रवर्ती सम्राट अशोक आदर्श बुध्दविहार स्पर्धा पारितोषिक वितरण समारंभ २५ जानेवारी २०२६ रोज रविवारला थाटात संपन्न होणार आहे.
कार्यक्रमाची वेळ सकाळी ११ वाजता असून,कार्यक्रमाचे स्थळ मिलन सभागृह,मेन रोड,चिमूर,जि.चंद्रपूर आहे.
वामनराव पाटील स्मृती प्रतिष्ठानने चिमूर तालुक्यातील बुध्द विहारांकरिता चक्रवर्ती सम्राट अशोक आदर्श बुध्दविहार स्पर्धेचे आयोजन केले होते.
या स्पर्धेत सहभागी झालेल्या बुध्दविहारांचा पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात आला आहे.
सर्व बुध्द विहारांचे पदाधिकारी,सदस्य व उपासक – उपासिकांनी या पारितोषिक वितरण समारंभास उपस्थित रहावे अशी विनंती आयोजकांनी केली आहे.
पारितोषिक वितरण समारंभास मुख्य अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्याचे न्याय व विधी,अर्थ, नियोजन, कृषी,मदत व पुनर्वसन,कामगार राज्यमंत्री नामदार अँड.आशिष जैस्वाल हे उपस्थित राहणार आहेत.
बुध्दगया महाबोधी विहाराच्या मुक्तीसाठी महाराष्ट्र राज्याचे न्याय व विधीमंत्री ना.अँड.आशिष जैस्वाल यांना चिमूर तालुक्यातील उपासक उपासिकांकडून निवेदन द्यायचे आहे.हे निवेदन देण्याकरीता मोठ्या संख्येने उपस्थित राहून ऐतिहासिक लढ्याचा भाग बनूया असे आयोजकांचे म्हणणे आहे.
महाराष्ट्र शासनाला दिलेल्या निवेदनाचा प्रस्ताव बिहार सरकारला पाठवून बुध्दगया महाबोधी विहाराच्या मुक्तीसाठीचा संघर्ष अधिक तीव्र करण्यास आपल्या क्रांतीभूमीचा निश्चितच हातभार लागेल अशी अपेक्षा आयोजकांची आहे.
ना.आशिष जैस्वाल यांना निवेदन देण्यासाठी चिमूर तालुक्यातील उपासक – उपासिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे,असे आवाहन विनंतीसह आयोजकांनी केले आहे.
स्पर्धेत सहभागी प्रत्येक बुध्दविहारांसाठी विशेष भेट देण्यात येणार असल्याने ही भेट स्विकारण्यासाठी सर्व कार्यकारिणी सदस्यांनी आवर्जून उपस्थित रहावे,असा आयोजकांचा आग्रह आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष चिमूर नगराध्यक्ष गिताताई लिंगायत असणार आहेत.तर मुख्य अतिथी म्हणून ना.अॅड. आशिष जैस्वाल न्याय व विधी,अर्थ,नियोजन,कृषी,मदत हे उपस्थित राहणार आहेत.
विशेष अतिथी म्हणून डॉ.नितीन राऊत माजी मंत्री तथा आमदार नागपूर,इंजि. राजकुमार बडोले माजी मंत्री तथा आमदार,श्री.कीर्तिकुमार (बंटी) भांगडीया आमदार,डॉ.संजय मेश्राम आमदार उमरेड हे आवर्जून उपस्थित राहणार आहेत.
सकाळी १० वा. पासून बौध्द उपासक – उपासिकांसाठी GSARS Group व्दारा भीम बुध्द गीतांचा मनोरंजनात्मक कार्यक्रम होणार आहे.
कार्यक्रमाचे आयोजक अँड.भूपेश पाटील व सुरेश डांगे आहेत.
अधिक माहिती करिता खालील मोबाईल क्रमांकावर संपर्क करावे…
सुरेश डांगे मो. 9403316835,हरी मेश्राम मो. 9420139369,विरेंद्र बन्सोड मो. 9850514357,सुधाकर गणवीर मो. 7350272867, रामदास कामडी मो. 9421815919,प्रियानंद गेडाम मो. 9271629147,ऋषिकेश मोटघरे मो. 9579147395,नितीन पाटील मो. 9527319760….



