अंकिता पाटील ठाकरे यांची पुणे जिल्हा भाजप युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी निवड…

 

नीरा नरसिंहपुर दिनांक :22

प्रतिनिधी :-बाळासाहेब सुतार ,

         पुणे जिल्हा परिषदेचे सदस्या व इस्मा नवी दिल्लीच्या कायदेशीर समितीच्या सहअध्यक्षा अंकिता पाटील ठाकरे यांची पुणे जिल्हा भाजप युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. 

               अंकिता पाटील ठाकरे यांनी बावडा- लाखेवाडी जि. प. मतदार संघातून राज्यात विक्रमी मताधिक्य मिळवून आपली राजकीय कारकीर्द सुरु केली. पुणे जिल्हा परिषदेमध्ये त्यांनी अतिशय कार्यक्षमतेने काम केले. सध्या त्या विविध संस्थांवर पदाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. तसेच राजकीय क्षेत्राबरोबरच शैक्षणिक, सहकार व सामाजिक क्षेत्रामध्ये अंकिता पाटील ठाकरे यांच्या उल्लेखनीय कामगिरीचा चढता आलेख पहावयास मिळत आहे. त्याचबरोबर महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्या अग्रभागी आहेत. पुणे जिल्हा भाजपचे अध्यक्ष वासुदेव काळे यांनी अंकिता पाटील ठाकरे यांची ही निवड जाहीर केली. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजप नेते हर्षवर्धन पाटील आदी भाजप नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपची पक्ष संघटना मजबूत करणेसाठी व पक्षाची ध्येय धोरणे तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी कार्यरत राहू, अशी ग्वाही निवडीनंतर अंकिता पाटील ठाकरे यांनी दिली.